Google AI Plus Plan : सध्या जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयची चर्चा आहे. अशा परिस्थितीत एआयच्या युगात आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी टेक कंपन्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर गूगलने भारतात आपला सर्वात स्वस्त आणि आकर्षक 'Google AI Plus Plan' लॉन्च केला आहे. या नव्या प्लॅनमुळे यूजर्सना आता गुगल जेमिनीच्या प्रो आणि फ्री प्लॅनच्या मधला एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. यामुळे युजर्स त्यांच्या गरजेनुसार एआय अनुभवाचा लाभ घेऊ शकतील. ChatGPT ला धोबीपछाड देण्यासाठी गुगलच्या जेमिनीच्या या नवीन प्लॅनमध्ये कमी किमतीत उत्कृष्ट फीचर्स दिले जात आहेत.
Google AI Plus Plan चे प्रमुख फीचर्स
- युजर्सना जेमिनी ३ प्रो द्वारा संचालित Nano Banana Pro कॉम्प्युटरचा ॲक्सेस मिळेल.
- युजर्स थेट Gmail, Vids आणि Docs सारख्या गूगलच्या ॲप्लिकेशन्समध्ये जेमिनीचा वापर करू शकतील.
- जेमिनीच्या इमेज टू व्हिडीओ क्रिएशन फीचरचा ॲक्सेस मिळेल.
- या प्लॅनमध्ये ग्राहकांना २०० GB क्लाउड स्टोरेज (Google Drive, Gmail आणि Photos साठी) दिले जात आहे.
- युजर्सना Flow आणि Veo 3.1 चाही ॲक्सेस मिळेल.
- नोटबूक एलएमसह राइटिंग आणि रिसर्च असिस्टंटचा लाभ मिळेल. (फ्री टूल वापरणाऱ्यांना केवळ रिसर्च आणि राइटिंग टूल मिळतात).
- व्हिडीओ तयार करणाऱ्या युजर्ससाठी दरमहा २०० AI क्रेडिट्स मोफत दिले जातील.
गूगल एआय प्लस प्लॅनची किंमत
युजर्स सुरुवातीचे ६ महिने हा प्लॅन फक्त १९९ रुपये प्रति महिना दराने घेऊ शकतात.६ महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर या प्लॅनसाठी ३९९ रुपये प्रति महिना शुल्क भरावे लागेल.
प्लॅन ॲक्टिव्हेट करण्याची प्रक्रिया
- सर्वात आधी फोनमधील गूगल प्ले स्टोर किंवा ॲप स्टोरवरून Google Gemini ॲप डाउनलोड करा.
- ॲप उघडून डाव्या बाजूला दिलेल्या प्रोफाइलच्या पर्यायावर क्लिक करा.
- आता ‘अपग्रेड टू जेमिनी प्रो’ या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर, तुम्हाला Google AI Plus Plan वर क्लिक करून सब्सक्रिप्शन घेण्यासाठी पेमेंट करावे लागेल.
- पेमेंट पूर्ण झाल्यावर हा प्लॅन ॲक्टिव्हेट होईल आणि तुम्ही सर्व फीचर्सचा लाभ घेऊ शकाल.
वाचा - जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
जगभरातील एआय युजर्समध्ये जेमिनीची लोकप्रियता वाढत असताना, कमी किमतीतील या नवीन प्लॅनमुळे भारतातील युजर्सची संख्या लक्षणीय वाढण्याची शक्यता आहे.
Web Summary : Google launched its cheapest 'AI Plus Plan' in India. This plan offers Gemini Pro access and 200GB cloud storage. Available for ₹199/month initially, then ₹399. Aims to rival ChatGPT with affordable AI features.
Web Summary : गूगल ने भारत में सबसे सस्ता 'AI Plus Plan' लॉन्च किया। इस प्लान में जेमिनी प्रो एक्सेस और 200GB क्लाउड स्टोरेज मिलेगा। शुरुआती 6 महीनों के लिए ₹199/महीना, फिर ₹399। ChatGPT को टक्कर देने का लक्ष्य।