Join us

गुगलमध्ये १.६ कोटी पगार, तरीही 'ती' म्हणते न्यूयॉर्कमध्ये खर्च भागवणं कठीण! भारतीय तरुणीची पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 12:46 IST

Expenses in New York : गुगलमध्ये दरमहा १७ लाख रुपये पगार असलेल्या भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीने महिन्याला पैसे पुरत नसल्याचे वास्तव सांगितले आहे. यात अडीच लाख रुपये फक्त घरभाड्यावर खर्च होत असल्याचे तिने सांगितले.

Expenses in New York : शहर जितकं मोठं, तितके त्याचे खर्च जास्त! हीच गोष्ट न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या मैत्री मंगल या भारतीय मुलीनेही अनुभवातून सांगितली आहे. मैत्रीने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये न्यूयॉर्कसारख्या शहरात राहणं किती महाग आहे हे स्पष्ट केलं आहे. तिची ही पोस्ट व्हायरल झाली असून, हजारो लोकांनी त्यावर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मैत्री सध्या गुगलमध्ये काम करते आणि तिचं वार्षिक पगार पॅकेज सुमारे १.६ कोटी रुपये आहे. तरीही ती म्हणते की, जर तुम्ही मोठ्या शहरात राहत असाल, तर सात आकड्यांचे पॅकेजही कमी पडेल!

मोठा पगारही पुरेसा नाही?मैत्रीने न्यूयॉर्कमधील पॉडकास्टर कुशल लोढा यांच्याशी तिच्या अनुभवाबद्दल संवाद साधला. या संभाषणात तिने गुगलकडून मिळणाऱ्या पगाराबद्दल आणि अमेरिकेतील तिच्या खर्चाबद्दल सविस्तर माहिती दिली. मैत्रीचं म्हणणं आहे की, इतका मोठा पगार असूनही, न्यूयॉर्कमध्ये राहण्याचा खर्च भागवणं कठीण आहे. जर तुम्हाला न्यूयॉर्कसारख्या आलिशान शहरात राहायचं असेल, तर त्यासाठी खूप पैसे खर्च करण्याची तयारी ठेवावी लागेल. गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या मैत्रीला १.६ कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळते, जे मासिक सुमारे १३ लाख रुपये होतं.

मासिक खर्च किती? ऐकून थक्क व्हाल!मैत्रीने सांगितलं की, इतके पैसे कमवूनही तिचा मासिक खर्च भागवणं आव्हानात्मक आहे, कारण न्यूयॉर्क हे जगातील सर्वात महागड्या शहरांपैकी एक आहे.

  • तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या अपार्टमेंटचं भाडं तिला दरमहा २.५ लाख रुपये द्यावं लागतं.
  • केवळ आवश्यक वस्तूंवर ती दरमहा सुमारे ५ हजार डॉलर्स (सुमारे ४.२ लाख रुपये) खर्च करते.
  • याशिवाय, तिच्या रोजच्या खर्चावर १ ते २ हजार डॉलर्स (म्हणजे भारतीय रुपयांमध्ये ८६ हजार ते १.७१ लाख रुपये) खर्च होतात.
  • वाहतूक खर्चाच्या स्वरूपात सुमारे २०० डॉलर्स (१७ हजार रुपयांपेक्षा जास्त) खर्च येतो.

वाचा - ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर

युझर्सनी दिल्या सूचनामैत्रीच्या या पोस्टवर अनेक युझर्सनी त्यांच्या सूचना आणि अनुभव शेअर केले आहेत. अनेकांनी खर्च कमी करण्याचे आणि न्यूयॉर्कमध्ये राहण्याचे विविध मार्ग सांगितले. बहुतेक लोकांनी कमेंट केली की, न्यूयॉर्कसारख्या शहरात उत्पन्न आणि खर्चात खूपच कमी फरक आहे, जो जगातील इतर शहरांपेक्षा खूप जास्त आहे. मैत्री इंस्टाग्रामवर तंत्रज्ञानाशी संबंधित व्हिडिओ देखील अपलोड करत असते आणि तिचे सुमारे १७.३ लाख फॉलोअर्स आहेत.

टॅग्स :गुगलअमेरिकामहागाईमाहिती तंत्रज्ञान