Join us
Daily Top 2Weekly Top 5

२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 14:42 IST

LIC Bonus Stocks: देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये बुधवारी मोठी तेजी पाहायला मिळाली. यामध्ये ८ टक्क्यांची वाढ झाली.

LIC Bonus Stocks: देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (LIC) शेअरमध्ये बुधवारी मोठी तेजी पाहायला मिळाली. कामकाजादरम्यान एलआयसीचा शेअर ८ टक्क्यांहून अधिक वाढीसह ८०२ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. कंपनी आपल्या भागधारकांना पहिल्यांदाच बोनस शेअर देण्याबाबत विचार करू शकते, हे या तेजीचं मुख्य कारण आहे. यासाठी कंपनी लवकरच बोर्ड मीटिंग करू शकते. 'ट्रेंडलाइन'नुसार, डिसेंबर २०२५ पर्यंत कंपनीमध्ये २१ लाख किरकोळ गुंतवणूकदारांचीगुंतवणूक होती. बोनस शेअरची घोषणा झाल्यास ही या सर्व गुंतवणूकदारांसाठी मोठी आनंदाची बातमी ठरेल.

१३ एप्रिल रोजी होणार महत्त्वाची बोर्ड मीटिंग

एलआयसीनं ७ एप्रिल रोजी शेअर बाजारात दाखल केलेल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये माहिती दिली की, भागधारकांना बोनस शेअर देण्याबाबत चर्चा करण्यासाठी १३ एप्रिल रोजी बोर्डाची बैठक आयोजित केली जाईल. तसंच, कंपनीनं अद्याप या बोनस शेअरसाठी कोणतीही "रेकॉर्ड डेट" निश्चित केलेली नाही.

RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 

ट्रेडिंग विंडो बंद

एलआयसीनं दिलेल्या माहितीनुसार, त्यांची 'ट्रेडिंग विंडो' सध्या बंद आहे. याचा अर्थ कंपनीचे अंतर्गत लोक (उदा. संचालक, कर्मचारी) सध्या एलआयसीचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकत नाहीत. ही ट्रेडिंग विंडो ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीचे आणि पूर्ण वर्षाचे आर्थिक निकाल जाहीर झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद राहील.

पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअरची भेट

एलआयसी २०२२ मध्ये लिस्ट झाल्यानंतर पहिल्यांदाच बोनस शेअर देण्यावर विचार करत आहे. आतापर्यंत एलआयसीनं आपल्या गुंतवणूकदारांना कधीही बोनस शेअर दिलेले नाहीत. मात्र, कंपनीने नियमितपणे लाभांश दिला आहे.

बोनस शेअर म्हणजे काय?

कंपन्या आपल्या अतिरिक्त राखीव निधीचा वापर करून बोनस शेअर जारी करतात. यामुळे शेअर्सची संख्या आणि कंपनीचं भांडवल वाढतं, तर राखीव निधी कमी होतो. याचा प्रति शेअर उत्पन्न (EPS) सारख्या मापदंडांवरही परिणाम होऊ शकतो. भागधारकांसाठी ही चांगली गोष्ट आहे कारण त्यांना कोणतेही पैसे न भरता अतिरिक्त शेअर्स मोफत मिळतात, म्हणूनच बोनस शेअर्सना 'मोफत शेअर्स' असंही म्हणतात.

कंपनीचे तिमाही निकाल

एलआयसीनं आर्थिक वर्ष २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना सांगितलं की, त्यांचा निव्वळ नफा मागील वर्षाच्या तुलनेत १७% वाढून १२,९५८ कोटी रुपये झालाय. कंपनीने नवीन विमा व्यवसाय आणि गुंतवणुकीतून अधिक उत्पन्न मिळवल्यामुळे ही वाढ झाली आहे. तसेच, एलआयसीचे प्रीमियम उत्पन्न गेल्या वर्षाच्या याच तिमाहीतील १,०६,८९१ कोटी रुपयांवरून वाढून १,२५,६१३ कोटी रुपये झालं आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Good news for investors! LIC may offer bonus shares soon.

Web Summary : LIC considers its first-ever bonus share issue, boosting investor sentiment. A board meeting on April 13th will discuss the proposal. 2.1 million retail investors stand to benefit. LIC's profits rose, driven by new insurance business and investments.
टॅग्स :एलआयसीशेअर बाजारगुंतवणूकपैसा