Join us

सोने ५७,५०० तर चांदी ८१ हजारांवर जाणार? जाणकारांचे मत; सोन्याची मागणी वाढतेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 08:43 IST

येत्या मार्चपर्यंत सोन्याचा दर ५७,५०० रुपयांच्या,तर चांदीचा दर ८१ हजार रुपयांच्या वर जाण्याची शक्यता आहे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: येत्या मार्चपर्यंत सोन्याचा दर ५७,५०० रुपयांच्या,तर चांदीचा दर ८१ हजार रुपयांच्या वर जाण्याची शक्यता आहे, असे जाणकारांनी सांगितले. सध्या सोन्याचा भाव ५४,५७४ रुपये प्रति १० ग्रॅम तर चांदी ६३,४६१ रुपये प्रति किलो आहे.

चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. इतरही काही देशांत कोविडच्या नव्या विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. त्यासोबतच जगावर सध्या मंदीचे सावट आहे. या दोन्ही बाबी सोन्याच्या किमतीत वाढ होण्यासाठी पोषक आहेत.  जाणकारांच्या मते,मार्च २०२३ मध्ये सोन्याच्या भावात आणखी तेजी दिसू शकते. मार्चपर्यंत सोन्याचा दर ५७,५०० रुपये प्रति १० ग्रॅम होऊ शकतो. त्याचवेळी चांदीही वाढून ८१,००० रुपये प्रति किलो होऊ शकते. 

सोन्यात गुंतवणूक का?

- ‘केडिया ॲडव्हायजरी’ चे संचालक अजय केडिया यांनी सांगितले की,सोन्याचा दर जानेवारीत १६०० रुपये, तर मार्चपर्यंत ३ हजार रुपयांपर्यंत वाढू शकतो. याचाच अर्थ नव्या वर्षात सोने अडीच वर्षांनंतर प्रथमच ५६,२०० रुपयांचा टप्पा पार करून पुढे जाईल. 

-  कोविड विषाणूच्या नव्या व्हेरिएंटचा परिणाम जगभर दिसू लागल्यामुळे गुंतवणूकदार शेअर बाजार व अन्य मालमत्तातून पैसा काढून घेऊन सोन्याकडे वळवत असल्याचे दिसून आले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :सोनंचांदी