Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Silver Price Today: चांदी ४,६७४ रुपयांनी महागली, सोन्यातही मोठी तेजी; पटापट चेक करा दिल्ली, मुंबई, पाटण्यातल लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 10:25 IST

Gold Silver Price Today: आज ६ मार्च २०२६ रोजी सोने आणि चांदीच्या भावात तेजी दिसून येत आहे. महागाईचा दबाव आणि जागतिक मागणीमुळे किंमतीत वाढ झाली आहे.

 Gold Silver Price Today: आज ६ मार्च २०२६ रोजी सोने आणि चांदीच्या भावात तेजी दिसून येत आहे. कमोडिटी मार्केटमध्ये स्थानिक मागणी, जागतिक कल आणि चलन दरांमुळे चढ-उताराची स्थिती पाहायला मिळत असली, तरी महागाईचा दबाव आणि जागतिक मागणीमुळे किंमतीत किरकोळ वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया (MCX) वर आठवड्याच्या शेवटच्या व्यापारी दिवशी, म्हणजेच शुक्रवारी बाजार उघडताच सोन्याचा भाव १,६०,८२० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,६७,१७३ रुपये प्रति किलोवर पोहोचला.

एका दिवसातील दरवाढ

गुरुवारी एमसीएक्सवर सोन्याची किंमत १,५९,९२० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीची किंमत २,६२,४९९ रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. म्हणजेच, सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम ९०० रुपयांची, तर चांदीच्या भावात प्रति किलो ४,६७४ रुपयांची मोठी वाढ झाली आहे. 

तेजीनंतर शेअर बाजारात आज भूकंप, Sensex ५३७ अंकांनी आपटला; निफ्टीतही घसरण, या प्रमुख स्टॉक्सला झटका

भारतात सोने आणि चांदी यांसारखे मौल्यवान धातू केवळ संस्कृतीचा भाग नसून अर्थव्यवस्थेचाही महत्त्वाचा घटक आहेत. लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात होणारी मोठी खरेदी तसेच गुंतवणुकीचा दृष्टिकोन यामुळे सामान्य जनता आणि गुंतवणूकदार या किंमतींमधील बदलांकडे बारकाईनं लक्ष ठेवून असतात.

प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर

दिल्ली: २४ कॅरेट सोन्याची किंमत १,६३,०२० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,४९,४४० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.

मुंबई: २४ कॅरेट सोन्याची किंमत १,६२,८७० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव १,४९,२९० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

पाटणा: येथे २२ कॅरेट सोन्याची किंमत १,४९,१४० रुपये प्रति १० ग्रॅम इतकी झाली आहे.

चेन्नई: चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १,६४,९४० रुपये प्रति १० ग्रॅम असून २२ कॅरेट सोन्याचा दर १,५१,१९० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला.

चांदीच्या किंमतीत मोठी उसळी

गुड्स रिटर्नच्या माहितीनुसार, आज सोन्यापेक्षा चांदीच्या किंमतीत अधिक वाढ दिसून येत आहे. दिल्ली, मुंबई आणि पाटणा येथे चांदीची किंमत २,८४,९०० रुपये प्रति किलो झाली आहे, तर चेन्नईमध्ये चांदीचा दर २,९४,९०० रुपये प्रति किलोवर पोहोचला.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold, silver prices surge: Check latest rates in major cities.

Web Summary : Gold and silver prices are soaring. Silver jumped by ₹4,674 per kg. Gold also witnessed a significant rise. Check rates for Delhi, Mumbai, and Patna. Gold reached ₹60,820 per 10 grams, and silver hit ₹67,173 per kg on MCX.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक