Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Price Today: सोन्याच्या दरात बदल; पटापट चेक करा दिल्ली ते मुंबई Gold ची लेटेस्ट किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 15:21 IST

Gold Price Today 24 Feb 2026: आज सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या भावात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. पाहा काय आहेत सोन्याचे नवे दर.

Gold Price Today 24 Feb 2026: आज सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या भावात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. bullions.co.in नं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव आज ९५० रुपयांनी स्वस्त होऊन १,६१,१६० रुपये प्रति १० ग्रॅमवर आलाय.

विविध शहरांचा विचार केला असता, दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोनं १,६०,५९० रुपये प्रति १० ग्रॅम दरानं विकलं जात आहे. मुंबईत हा दर १,६०,८६० रुपये आणि कोलकात्यात १,६०,४३० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. दुसरीकडे चेन्नईमध्ये १,६१,११० रुपये आणि लखनौमध्ये सोन्याचा भाव १,६०,६९० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. इंदूरमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा दर १,६०,८१० रुपये असून जयपूरमध्ये तो १,६०,६२० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

केवळ मोबाईल आणि इंटरनेट सर्व्हिसच नाही तर, Airtel आता 'या' व्यवसायात ₹२०,००० कोटींची गुंतवणूक करणार

आयबीजेएनुसार सोन्याचे आजचे दर

आयबीजेएनं (IBJA) जारी केलेल्या दरांनुसार, आज २४ फेब्रुवारी रोजी 'गोल्ड ९९९' चा भाव सोमवारच्या बंद भावाच्या तुलनेत १,२८३ रुपयांनी महाग होऊन १,५९,५०३ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. या नवीन दरानुसार, आता सोनं सराफा बाजारातील त्याच्या १,७६,१२१ रुपयांच्या 'ऑल टाइम हाय' रेकॉर्डपेक्षा १६,६१८ रुपयांनीच स्वस्त राहिलं आहे. जीएसटीसह (GST) सोन्याची किंमत आज १,६४,२८८ रुपयांवर पोहोचली आहे.

१८ आणि २२ कॅरेट सोन्याचे आजचे ताजे दर

बाजारातील ताज्या आकडेवारीनुसार, २२ कॅरेट सोनं आता जीएसटीसह १,५०,४८८ रुपयांवर पोहोचलं आहे, तर १८ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह १,२३,२१५ रुपये झालाय. सोमवारी 'गोल्ड ९९९' चा दर जीएसटीशिवाय १,५८,२२० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. आयबीजेए दिवसातून दोनदा सोन्याचे दर जाहीर करते.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold Prices Fluctuate: Check the Latest Rates in Major Cities

Web Summary : Gold prices see changes. 24 Carat gold dips by ₹950 to ₹1,61,160 per 10 grams. City rates vary: Delhi (₹1,60,590), Mumbai (₹1,60,860), Kolkata (₹1,60,430). IBJA reports 'Gold 999' at ₹1,59,503, ₹16,618 below its all-time high.
टॅग्स :सोनंगुंतवणूकपैसा