Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतीमुळे RBI चिंतेत? अर्थमंत्र्यांनीही केलं Gold वर मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 15:41 IST

FM, RBI Governor on Gold Silver Price: २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सोन्या आणि चांदीच्या किमतीत प्रचंड वाढ नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय आणि भारतीय बाजारपेठा उघडताच सोन्या-चांदीच्या दरांनी उसळी घेतली.

FM, RBI Governor on Gold Silver Price: २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सोन्या आणि चांदीच्या किमतीत प्रचंड वाढ नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय आणि भारतीय बाजारपेठा उघडताच सोन्या-चांदीच्या दरांनी उसळी घेतली. एमसीएक्स (MCX) वर सोन्याचा दर १,५९,५८५ रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचला आहे, तर चांदीचा भाव २,६४,६०० रुपये प्रति किलोपर्यंत आला आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी या मौल्यवान धातूंबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलंय.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!भारतात सोनं हे नेहमीच घरगुती गुंतवणुकीसाठी पसंतीचा पर्याय राहिलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं की, देशांतर्गत वापरामुळे सणासुदीच्या काळात सोन्याच्या मागणीत मोठी वाढ पाहायला मिळते. सरकार या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे, परंतु सध्या ही स्थिती भारतातील कोणत्याही चिंताजनक पातळीपर्यंत पोहोचलेली नाही आणि ती एका निश्चित मर्यादेच्या पलीकडे गेलेली नाही.

सोन्या-चांदीच्या दरवाढीची प्रमुख कारणं

जगभरातील बहुतांश मध्यवर्ती बँका सोनं आणि चांदीची खरेदी करून साठा करत आहेत, असं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं. याच कारणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्यानं तेजी दिसून येत आहे. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या या खरेदीचा थेट परिणाम बाजारभावावर होत आहे.

आरबीआय गव्हर्नरांची भूमिका

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, सोन्याच्या हालचालीवर आरबीआयची नजर आहे. एप्रिल ते डिसेंबर दरम्यान मूल्याच्या दृष्टीनं सोन्याच्या आयातीत फारशी वाढ झालेली नाही. सोन्याच्या किमतीतील ही वाढ मुख्यत्वे आयातीच्या प्रमाणात झालेली घट यामुळे दिसून येत आहे.

सोन्याच्या किमतीबाबत सध्यातरी चिंतेचं कारण नाही

जानेवारी महिन्यात सोन्याच्या आयातीची आकडेवारी जास्त होती, ज्याचे मुख्य कारण मोसमी मागणीतील वाढ हे आहे. सोन्या-चांदीच्या आयातीबाबत सध्या तरी जास्त चिंता करण्याची गरज नसल्याचं गव्हर्नर यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या मते, भारताची चालू खात्यातील तूट सध्या नियंत्रणात असून ती जीडीपीच्या १ टक्क्याच्या आत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : RBI concerned about rising gold prices? Finance Minister comments on Gold.

Web Summary : Gold and silver prices surge, prompting statements from the Finance Minister and RBI Governor. While domestic demand is high, especially during festivals, the government is monitoring the situation. The RBI notes increased gold imports in January due to seasonal demand, but the current account deficit remains under control.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूकनिर्मला सीतारामन