Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Silver Price Today: चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 10:49 IST

Gold Silver rate Today: आज सोन्या आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि महागाईच्या चिंतेमुळे मौल्यवान धातूंचे दर खाली आले आहेत.

Gold Silver rate Today: मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियावर (MCX) आज सोन्या आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि महागाईच्या चिंतेमुळे मौल्यवान धातूंचे दर खाली आले आहेत.

जुलै २०२६ च्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव १,४८५ रुपयांनी घसरून १,६०,५१८ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. गुरुवारी हेच सोनं १,६२,००३ रुपयांवर बंद झालं होतं. तर दुसरीकडे जून २०२६ च्या डिलिव्हरीसाठी चांदीच्या दरात १०,२१० रुपयांची मोठी घसरण होऊन तो २,८१,०४९ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. गुरुवारी चांदीचा बंद भाव २,९१,२५० रुपये होता.

देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट

दरात घसरण होण्याची प्रमुख कारणं:

पश्चिम आशियातील तणाव : इराण आणि आसपासच्या प्रदेशातील तणावामुळे महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली असून, याचा दबाव कमोडिटी बाजारावर दिसून येत आहे.

जागतिक राजकीय घडामोडी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणाऱ्या चर्चेकडे गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं आहे.

कच्च्या तेलाचा भडका : कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे जागतिक स्तरावर महागाईची चिंता वाढली आहे.

चलन बाजारातील अस्थिरता : अमेरिकन डॉलरची मजबूती आणि रुपयाची कमकुवत स्थिती यामुळे बाजार दबावाखाली आहे.

तज्ज्ञांचं काय आहे मत?

पृथ्वी फिनमार्टचे तज्ज्ञ मनोज कुमार जैन यांच्या मते, अमेरिका-चीन शिखर परिषदेचा निकाल आणि डॉलर इंडेक्समधील चढ-उतारामुळे आज बाजारात मोठी अस्थिरता दिसू शकते. त्यांच्या मते सोन्यासाठी सपोर्ट लेव्हल १,६०,३००-१,५९,१०० रुपये आणि रेसिस्टन्स लेव्हल १,६३,२००-१,६४,४०० रुपये असू शकते. तर चांदीसाठी सपोर्ट लेव्हल २,८५,५००-२,७८,८०० रुपये आणि रेसिस्टन्स लेव्हल २,९६,६००-३,०२,००० रुपये असू शकते असं त्यांचं म्हणणं आहे.

जोपर्यंत अमेरिका आणि चीनच्या नेत्यांमधील बैठकीचा कोणताही ठोस निष्कर्ष समोर येत नाही, तोपर्यंत नवीन खरेदी करणं टाळावं, असा सल्ला मनोज कुमार जैन यांनी दिला आहे.

प्रमुख शहरांतील सोन्याचे दर

शहर24 कॅरेट सोन्याचा भाव22 कॅरेट सोन्याचा भाव18 कॅरेट सोन्याचा भाव
दिल्ली1,60,2401,46,9001,20,220
मुंबई1,60,0901,46,7501,20,070
भोपाळ1,60,1401,46,8001,20,120
हैदराबाद1,60,0901,46,7501,20,070
चेन्नई1,63,0901,49,5001,24,700
कोलकाता1,60,0901,46,7501,20,070
अहमदाबाद1,60,1401,24,7001,60,140
बंगळुरू1,60,0901,46,7501,20,070

प्रमुख शहरांमधील चांदीचे दर

देशातील विविध शहरांत चांदीचे किरकोळ दर खालीलप्रमाणे आहेत:
दिल्ली, मुंबई, कोलकाता, भोपाळ आणि बंगळुरू: २,९९,९०० रुपये प्रति किलो.
चेन्नई: ३,१४,९०० रुपये प्रति किलो.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold and Silver Prices Plunge Today: Check City-Wise Rates

Web Summary : Gold and silver prices fell sharply on MCX due to global factors. Gold dropped ₹1,485 to ₹1,60,518 per 10 grams, while silver plummeted ₹10,210 to ₹2,81,049 per kg. West Asia tensions and US-China talks impact prices. Experts advise caution.
टॅग्स :सोनंगुंतवणूकचांदी