Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Silver Price Iran Israel War: ₹३ लाखांच्या पार चांदी, २ लाख रुपये होणार सोनं? युद्धामुळे तुटणार का सर्व रेकॉर्ड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 19:08 IST

Gold, Silver Price Today:सोन्या आणि चांदीच्या किमतीतील वाढ सध्या सुरूच आहे. व्यवहाराच्या सलग पाचव्या दिवशी सोनं आणि चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली.

Gold, Silver Price Today:सोन्या आणि चांदीच्या किमतीतील वाढ सध्या सुरूच आहे. व्यवहाराच्या सलग पाचव्या दिवशी सोनं आणि चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत आहेत, ज्यामुळे या धातूंच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे.

आज पुन्हा वाढले सोने आणि चांदीचे दर

मंगळवारी 'COMEX' सोन्याचा दर १ टक्क्यांहून अधिक वाढीसह ५,३०० डॉलरच्या पार गेला. तसंच, 'COMEX' चांदीच्या किमतीतही वाढ झाली असून, चांदी आज ९१.६१ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर पोहोचलेत. दरम्यान, मल्टी कमोडिटी एक्सचेंजचं (MCX) पहिले सत्र आज बंद आहे. एमसीएक्सचं दुसरं सत्र आज संध्याकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहील.

सोमवारी एमसीएक्समध्ये सोन्याचा दर २.५३ टक्क्यांच्या उसळीनंतर १,६६,१९९ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. तर, चांदीचा दर सोमवारी घसरणीसह २,८०,०९० रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला होता.

सोने २ लाख रुपयांच्या पार जाणार?

जागतिक अनिश्चिततेमुळे सोन्या-चांदीच्या किमतीतील तेजी कायम राहील, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जिओजित इन्व्हेस्टमेंटचे कमोडिटी रिसर्च हेड हरीश व्ही म्हणतात, "देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याचा भाव जास्तीत जास्त २ लाख रुपयांपर्यंत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ६,००० डॉलर प्रति औंसपर्यंत जाऊ शकतो." तज्ज्ञांच्या मते चांदीचा भाव पुन्हा एकदा १०० डॉलरच्या पातळीपर्यंत पोहोचू शकतो.

तज्ज्ञ रेनिषा यांच्या मते, चांदीचा दर ९५ डॉलरवर (२,९३,००० रुपये) रेझिस्टंस अनुभवत आहे. जर हा स्तर ओलांडण्यात चांदी यशस्वी झाली, तर चांदीचा दर ३,१०,००० ते ३,२५,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. २,६५,००० रुपये ही चांदीसाठी सपोर्ट लेव्हल आहे.

सिल्वर ईटीएफमध्ये १३९% ची वाढ

जानेवारी महिना सिल्वर ईटीएफच्या (Silver ETF) प्रवाहाच्या दृष्टीनं ऐतिहासिक ठरला आहे. या काळात सिल्वर ईटीएफचा निव्वळ प्रवाह ९,५०० कोटी रुपये राहिला. डिसेंबर २०२५ मध्ये हा प्रवाह ४,००० कोटी रुपये होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Silver past ₹3 Lakhs, Gold at ₹2 Lakhs? War Impact?

Web Summary : Gold and silver prices surge amid Middle East tensions. Experts predict gold could reach ₹2 lakh and silver $100, driven by global uncertainty. Silver ETFs see a massive inflow.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूकपैसा