Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold: चार दिवसांपासून सोन्याच्या किमतील लक्षणीय घट, आता एवढं झालंय स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 23:20 IST

Gold: जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हीच योग्य वेळ आहे. सोन्याच्या किमतीमध्ये सातत्याने घट होत आहे. हा क्रम गेल्या चार दिवसांपासून सातत्याने सुरू आहे.

जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हीच योग्य वेळ आहे. सोन्याच्या किमतीमध्ये सातत्याने घट होत आहे. हा क्रम गेल्या चार दिवसांपासून सातत्याने सुरू आहे. सध्या १० ग्रॅम सोन्याचा भाव हा ६० हजार रुपयांपेक्षा खाली आला आहे. सोन्यासोबत चांदीची किंमतसुद्धा कमी झाली आहे. मंगळवारी चांदीचा दर ३५ रुपयांनी कमी होऊन ७२ हजार २५० रुपये प्रति किलो ग्रॅम एवढा झाला आहे.

कमकुवत जागतिक सौद्यांमुळे दिल्लीच्या सराफा बाजारामध्ये मंगळवारी सोनं ९० रुपयांनी स्वस्त होऊन ५९ हजार ९४५ रुपयांवर आलं आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजने ही माहिती दिली आहे. सोमवारी सोने ६० हजार ३५ रुपये प्रति दहा ग्रॅम या दरावर बंद झालं होतं. सोन्याच्या दरातील ही घट गेल्या आठवड्यातील गुरुवारपासून सुरू आहे. बुलियन मार्केटमध्ये सोनं सकाळीच ६० हजार रुपयांच्या स्तरावरून खाली घसरलं होतं. तसेच दिवस संपताना ही घसरण अधिकच वाढली.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार गोल्ड ९९९ (२४ कॅरेट) चा दर हा ५९ हजार ९८१ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला होता. तर २२ कॅरेट सोन्याचा दर हा ५ हजार ८९५ रुपये प्रति ग्रॅम, २० कॅरेट सोन्याचा दर हा ५ हजार ३७६ रुपये प्रति दहा ग्रॅम, तर १८ कॅरेट सोन्याची किंमत ही ४ हजार ८९३ रुपये प्रति ग्रॅम आमि १४ कॅरेट सोन्याची किंमत ही ३ हजार ८९६ रुपये प्रति ग्रॅम इतकी कमी झाली आहे. मात्र दागिन्यांमध्ये बहुतांश २२ कॅरेट सोन्याचाच वापर केला जातो.  

टॅग्स :सोनंचांदीपैसा