Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Rate: घसरणीनंतर सोने-चांदीत पुन्हा वाढ; डॉलरचे दर वधारल्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 00:33 IST

Gold Rate: सध्या लग्नसराई नसल्याने सोने-चांदीचे भाव कमी झाल्याचे चित्र होते.

जळगाव : शुक्रवारी घसरण झालेल्या सोने-चांदीच्या भावात शनिवारी पुन्हा वाढ झाली असून डॉलरचे दर वधारल्याचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी एक हजार ८०० रुपयांची घसरण झाल्यानंतर शनिवारी एक हजार ३०० रुपयांनी वाढ होऊन चांदी ७० हजारांवर पोहोचली तसेच सोन्याच्याही भावात ४०० रुपयांनी वाढ होऊन ते ४७ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.  सध्या लग्नसराई नसल्याने सोने-चांदीचे भाव कमी झाल्याचे चित्र होते. 

टॅग्स :सोनंमहाराष्ट्र