नवी दिल्ली: भारतात सोने केवळ गुंतवणुकीचे साधन नसून ते कौटुंबिक परंपरा आणि शुभ कार्याचा अविभाज्य भाग मानले जाते. विशेषतः लग्नसराईत सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी लोकांची लगबग असते. मात्र, सोन्याच्या गगनाला भिडलेल्या किंमती पाहता, "आत्ताच सोने खरेदी करावे की भाव कमी होण्याची वाट पाहावी?" असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
गेल्या दोन वर्षांत सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २०२४ मध्ये जे सोने ७० ते ८० हजार रुपये प्रति १० ग्रॅम होते, ते आज १,५०,००० रुपयांच्या पार गेले आहे. कमोडिटी तज्ज्ञ अजय केडिया यांच्या मते, सोन्याच्या दरात चांदीसारखी मोठी चढ-उतार पाहायला मिळत नाही. सोन्यात साधारणतः १,००० ते २,००० रुपयांचा फरक पडू शकतो.
जर तुम्ही लग्नासारख्या घरगुती कार्यासाठी आणि दागिन्यांच्या उद्देशाने सोने खरेदी करणार असाल, तर भाव कमी होण्याची वाट पाहण्यात अर्थ नाही. तज्ज्ञांच्या मते, सोन्याला १,४५,००० रुपयांचा भक्कम सपोर्ट आहे, म्हणजेच किंमत घसरली तरी ती या पातळीपर्यंत येऊ शकते. मात्र, शॉर्ट टर्ममध्ये सोने १,६४,००० रुपये प्रति १० ग्रॅम पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्याकडे बजेट तयार असेल, तर आत्ताच खरेदी करणे फायद्याचे ठरेल.
विविध शहरांतील भाव (अंदाजे)सध्या पाटण्यामध्ये सोन्याचे दर तुलनेने कमी (₹१,५४,५७०) असून भोपाळ आणि इंदूरमध्ये ते सर्वाधिक (₹१,५४,८२०) आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्येही दर १.५४ लाखांच्या आसपास स्थिरावलेले पाहायला मिळत आहेत.
Web Summary : With wedding season approaching and gold prices high, experts advise buying now. Prices may rise to ₹1,64,000 per 10 grams, with strong support at ₹1,45,000. Delaying may not be beneficial for wedding jewelry purchases.
Web Summary : विवाह का मौसम नजदीक आने और सोने की कीमतें अधिक होने के साथ, विशेषज्ञ अभी खरीदने की सलाह देते हैं। कीमतें बढ़कर ₹1,64,000 प्रति 10 ग्राम हो सकती हैं, ₹1,45,000 पर मजबूत समर्थन के साथ। विवाह के गहने खरीदने के लिए देरी करना फायदेमंद नहीं हो सकता है।