Join us
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरात चांदी ४,५०० रुपयांनी स्वस्त, पण सोन्यात मोठी वाढ! महाशिवरात्रीला खरेदी करावे की थांबावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 10:29 IST

Gold Silver Price : या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय चढ-उतार झाले. गेल्या आठवड्यात एमसीएक्सवरील बंद किमतीच्या तुलनेत चांदीच्या किमती प्रति किलो ४,५०० रुपयाने कमी झाल्या.

Gold Silver Price : फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी अस्थिरता पाहायला मिळत आहे. आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर सराफा बाजारात संमिश्र वातावरण आहे. शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव १,५६,२०० रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला, तर चांदी २,४४,९९९ रुपये प्रति किलोवर स्थिरावली. गेल्या आठवडाभराचा कल पाहता सोन्याच्या किमतीत किरकोळ वाढ झाली असली, तरी चांदीच्या दरात मात्र मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.

एका आठवड्यातील दरांचे गणितगेल्या शुक्रवारच्या तुलनेत या शुक्रवारी बाजारातील चित्र खालीलप्रमाणे बदलले आहे. सोने : गेल्या शुक्रवारी सोने १,५५,०५० रुपयांवर होते, जे या शुक्रवारी १,५६,२०० वर पोहोचले. म्हणजेच आठवडाभरात सोन्यात १,१५० रुपयांची वाढ झाली.चांदी : चांदी गेल्या शुक्रवारी २,४९,४९९ रुपयांवर होती, ती आता २,४४,९९९ वर आली आहे. म्हणजेच चांदीच्या भावात ४,५०० रुपयांची घसरण झाली आहे.आंतरराष्ट्रीय बाजार : जागतिक बाजारातही सोन्याचा भाव ४,९८८ डॉलरवरून ५,०६३ डॉलर प्रति औंस वर पोहोचला आहे, तर चांदी ७७.५२ डॉलरवरून ७७.२७ डॉलर प्रति औंसपर्यंत खाली आली आहे.

चांदीतील अस्थिरतेमुळे ग्राहक संभ्रमातचांदीच्या किमतीत सध्या कमालीचे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. एका दिवशी तेजी तर दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, असा कल असल्यामुळे केवळ सामान्य ग्राहकच नव्हे तर मोठे गुंतवणूकदारही सध्या सोने-चांदीत मोठी गुंतवणूक करण्यास टाळाटाळ करताना दिसत आहेत.

प्रमुख शहरांतील आजचे दर (प्रति १० ग्रॅम/किलो)

शहर२४ कॅरेट सोने२२ कॅरेट सोने १८ कॅरेट सोने चांदी (प्रति किलो)
मुंबई १,५७,७५० १,४४,६०० १,१८,३१० २,७५,००० 
दिल्ली १,५७,९०० १,४४,७५० १,१८,४६० २,७५,००० 

वाचा - केवळ एक वर्षाचा परतावा पाहून म्युच्युअल फंड निवडताय? राधिका गुप्ता यांनी दिला गुंतवणुकीचा मोलाचा सल्ला(टीप : वरील दरांमध्ये स्थानिक कर आणि जीएसटीचा समावेश असू शकतो.) 

English
हिंदी सारांश
Web Title : Silver plunges ₹4,500, gold surges! Buy for Mahashivratri or wait?

Web Summary : Silver prices fell sharply by ₹4,500 this week, while gold saw a slight increase. Uncertainty in silver markets makes investors cautious during Mahashivratri. Experts advise careful consideration before investing.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूकशेअर बाजारस्टॉक मार्केट