Join us
Daily Top 2Weekly Top 5

₹१,१५,००० पर्यंत येऊ शकतो सोन्याचा भाव, चांदीच्या दरातही मोठ्या घसरणीची शक्यता; काय म्हणाले एक्सपर्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 09:33 IST

Gold and Silver Price Outlook: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी इराणच्या पॉवर प्लांटवरील हल्ले ५ दिवसांसाठी स्थगित करण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर, मंगळवारी सोन्या-चांदीच्या किमतीत काही प्रमाणात सुधारणा पाहायला मिळाली. मात्र

Gold and Silver Price Outlook: मध्य-पूर्वेतील तणावादरम्यान सोन्या-चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी इराणच्या पॉवर प्लांटवरील हल्ले ५ दिवसांसाठी स्थगित करण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर, मंगळवारी सोन्या-चांदीच्या किमतीत काही प्रमाणात सुधारणा पाहायला मिळाली. मात्र, ट्रम्प यांच्या या घोषणेच्या प्रभावीपणाबद्दल अजूनही शंका असल्याने गुंतवणूकदार सावध आहेत. दरम्यान, प्रसिद्ध कमोडिटी तज्ज्ञ आणि केडिया ॲडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांनी, नजीकच्या काळात सोन्या-चांदीच्या भावात घसरण कायम राहू शकते, असं मत व्यक्त केलं.

भविष्यात सोन्या-चांदीचे भाव किती खाली येऊ शकतात?

अजय केडिया यांच्या मते, सोन्याचा भाव घसरून १,१५,००० रुपये प्रति १० ग्रॅम पर्यंत खाली येऊ शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति औंस ३,४५० ते ३,५०० डॉलरपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. चांदीच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की, MCX वर चांदीचे दर १,७५,००० रुपये प्रति किलोपर्यंत खाली येऊ शकतात. मात्र, युद्धाच्या सुरुवातीच्या काळात घसरण झाल्यानंतर नंतरच्या टप्प्यात सोने-चांदीचे भाव सावरतात, असा इतिहास आहे. यामुळे वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा तेजी परतण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ४६,१८,३८५ रुपये; पाहा 'या' सरकारी योजनेत दरवर्षी किती करावी लागेल गुंतवणूक

४ दिवसांच्या घसरणीनंतर सोन्यात तेजी

ट्रम्प यांच्या घोषणेनंतर दिल्लीच्या सराफा बाजारात गेल्या ४ दिवसांपासून सुरू असलेल्या सोन्याच्या घसरणीला ब्रेक लागला. अखिल भारतीय सराफा संघाच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी सोन्याच्या किमतीत वाढ झाली, तर चांदीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मंगळवारी ९९.९ टक्के शुद्धतेचं सोनं १,२०० रुपयांच्या वाढीसह १.४४ लाख रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलं होतं. दुसरीकडे, चांदीचा भाव २.३० लाख रुपये प्रति किलोवर स्थिर राहिला. जागतिक कमोडिटी मार्केटमधील सुधारणा आणि मोठ्या घसरणीनंतर खालच्या स्तरावर झालेली खरेदी, यामुळे सोन्याच्या किमतीत ही वाढ नोंदवण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold price may fall to ₹1,15,000; experts predict silver drop.

Web Summary : Amidst Middle East tensions, gold and silver prices fluctuate. Experts predict gold may drop to ₹1,15,000 per 10 grams and silver to ₹1,75,000 per kg. A recovery is expected in the year's second half.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूकपैसा