Join us

Gold Price: सोनं खरेदी करण्याची सुवर्ण संधी, विक्रमी ११ हजार रूपयांनी स्वस्त झालं सोनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 18:22 IST

Gold Rates : पाहा आज किती आहे सोन्याचा दर

ठळक मुद्देसोन्याच्या दरात झाली घसरणचांदीच्या दरात झाली वाढ

जर तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आता तुमच्याकडे उत्तम संधी आहे. गेल्या दहा महिन्यांमध्ये सोन्याचे देर सर्वात खालच्या स्तरावर पोहोचले आहेत. दिल्लीत बुधवारी सोन्याचे दर २०८ रूपयांनी घसरून ४४,७६८ रूपये प्रति १० ग्रामवर बंद झाले. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात दिल्लीत सोन्याचे दर ५६ हजार २०० रूपये प्रति १० ग्राम इतके होते. दिल्लीत बुधवारी सोन्याचे दर ४४,७६८ रूपये प्रति १० ग्रामवर आले. यापूर्वीच्या सत्रात सोनं ४४,९७६ रूपये प्रति १० ग्रामवर बंद झालं होतं. तर दुसरीकडे चांदीच्या दरात ६०२ रूपयांची वाढ झाली. वाढ झाल्यानंतर चांदीचे दर ६८,१९४ रूपये प्रति किलोवर पोहोचले. यापूर्वीच्या सत्रात चांदी ६७,५९२ रूपयांवर बंद झाली होती. सोन्याच्या दरात आतापर्यंत जवळपास ११,५०० रूपयांची सर्वाधिक घसरण झाली आहे. २०२० या वर्षात सोन्याचे दर २८ टक्क्यांनी वाढले होते. परंतु आता गेल्या काही महिन्यात सोन्याच्या दरात घसरण होत आहे. केवळ याच वर्षात आतापर्यंत सोन्याचे दर ५ हजार रूपयांनी घसरले आहेत. तर चांदीच्या दरातही १० हजार रूपयांची घसरण झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या दरानं ५६ हजार २०० रूपयांचा आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. परंतु आता सोन्याचे दर ४४ हजार ७६८ रूपये प्रति १० ग्रामवर पोहोचले. जर सोन्याबाबत सांगायचं झालं तर गेल्या वर्षी सोन्यानं २८ टक्क्यांचं रिटर्न दिलं होतं. तर त्याच्या आधीच्या वर्षीही सोन्यानं २५ टक्क्यांचं रिटर्न दिलं होतं. तर तुम्ही दीर्घ कालावधीसाठी यात गुंतवणूकीचा विचार करत असाल तर हा पर्यायदेखील उत्तम आहे. २०२० हे वर्ष सोन्यासाठी उत्तम ठरलं होतं. या वर्षात सोन्याचे दर २८ टक्क्यांनी वाढले होते. ऑगस्ट महिन्यात तर सोन्या-चांदीच्या दरानं उच्चांक गाठला होता. केवळ भारतातच नाही तर जागतिक बाजारपेठेतही सोन्याच्या दरात २३ टक्क्यांची वाढ झाली होती. 

टॅग्स :सोनंचांदीभारतगुंतवणूकव्यवसाय