Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याचे दर १ लाखांपेक्षाही खाली येणार? मोठी अस्थिरता, पाहा आजचे ताजे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 14:06 IST

Gold Price Crash News: सोन्या-चांदीचा महाक्रॅश! ५३ दिवसांत सोने ४० हजार, तर चांदी १.८४ लाखांनी स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, याचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारावर झाला आहे. गेल्या ५३ दिवसांत सोन्या-चांदीच्या किमतीत विक्रमी घसरण झाली असून, ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या ताज्या आकडेवारीनुसार, सोने आणि चांदी आपल्या 'ऑल टाइम हाय' (सर्वोच्च स्तर) वरून जमिनीवर आले आहेत.

युद्ध सुरू झाल्यापासूनची मोठी घसरण:२८ फेब्रुवारी रोजी जेव्हा युद्ध सुरू झाले, तेव्हा २४ कॅरेट सोन्याचा दर १,६६,४६९ रुपये प्रति १० ग्रॅम होता. आज तो १,३४,६०० रुपयांवर आला आहे. म्हणजेच, केवळ महिनाभरात सोने ३१,८६९ रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्याचप्रमाणे, चांदीच्या दरातही ८८,३३८ रुपयांची मोठी घट झाली आहे.

उच्चांकापासून दरात मोठी तफावत

२९ जानेवारी २०२६ रोजी सोन्याने १.७६ लाखांचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर ५३ दिवसांत सोने ४०,९८० रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर २९ जानेवारीला चांदी ३.८६ लाखांवर होती. आता ती २,०१,५०० रुपयांवर आली आहे. म्हणजेच चांदी तब्बल १.८४ लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार आजचे सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम):

२४ कॅरेट (शुद्ध सोने): १,३४,६०० रुपये

२३ कॅरेट: १,३४,०६१ रुपये

२२ कॅरेट (दागिने): १,२३,२९४ रुपये

१८ कॅरेट: १,००,९५० रुपये

१४ कॅरेट: ७८,७४१ रुपये

चांदी (प्रति किलो): २,०१,५०० रुपये

सोन्याचे दर पुन्हा एकदा १ लाख रुपयांच्या खाली येणार का? याकडे आता सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold prices may fall below ₹1 lakh amid market volatility.

Web Summary : War-induced global instability significantly impacted Indian bullion market. Gold prices decreased by ₹31,869 in a month. Silver also saw a sharp decline. Further price drops are anticipated.
टॅग्स :सोनंइराणअमेरिका-इस्रायल-इराण वॉर