Gold and Silver Price : जागतिक राजकारणातील अनिश्चितता आणि अमेरिका-इराण युद्धाच्या संमिश्र संकेतांमुळे मौल्यवान धातूंच्या बाजारपेठेत सध्या मोठी धामधूम सुरू आहे. एमसीएक्स वर आज सकाळी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली असली, तरी किरकोळ बाजारात चांदीने मात्र ३ लाखांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
सोन्यात घसरण, चांदीत संमिश्र कलआज सकाळी ९ वाजता मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ४५७ रुपयांनी घसरून १,६२,८४६ रुपयांवर आले. दुसरीकडे, चांदीचा भाव प्रति किलो १,७६५ रुपयांनी घसरून २,७६,०८५ रुपयांवर व्यवहार करत होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध लवकरच संपण्याचे संकेत दिल्याने गुंतवणूकदारांनी 'सेफ हेवन' मानल्या जाणाऱ्या सोन्यातून नफेखोरी केल्याचे चित्र आहे.
तुमच्या शहरातील सोन्याचे दर (२२ कॅरेट/१० ग्रॅम)
| शहर | सोन्याचा भाव (रु.) |
| मुंबई, कोलकाता, बेंगळुरू | १,४८,८६० |
| दिल्ली, लखनऊ | १,४०,०१० |
| पाटणा, जयपूर | १,४०,९१० |
चांदीची 'सुसाट' धाव: चेन्नईत ३ लाखांचा टप्पा पार!सराफा बाजारात चांदीच्या किमतीत गेल्या दोन दिवसांत मोठी वाढ झाली आहे. दिल्लीत चांदीचा दर २,९०,१०० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. मात्र, चेन्नईने सर्वांना मागे टाकत ३,००,१०० रुपयांचा विक्रमी स्तर गाठला आहे. गेल्या दोन दिवसांत दिल्लीत चांदीच्या दरात एकूण १०,१०० रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.
वाचा - तेल साम्राज्यावर कुणाचे वर्चस्व? 'या' आहेत जगाताली टॉप १० कंपन्या; यात भारताचं स्थान कुठे?
बाजारातील अस्थिरतेची प्रमुख कारणे
- कच्च्या तेलात घसरण : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल ९० डॉलरच्या खाली आल्याने महागाईची चिंता काहीशी कमी झाली, ज्याचा सोन्याच्या दरावर नकारात्मक परिणाम झाला.
- डॉलरमध्ये कमजोरी : एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांच्या मते, अमेरिकन डॉलर आणि ट्रेझरी बाँडच्या उत्पन्नात झालेली घट यामुळे मौल्यवान धातूंना काही प्रमाणात आधार मिळाला आहे.
- IEA चा मोठा निर्णय : इंधन पुरवठ्यातील व्यत्यय दूर करण्यासाठी 'इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी'ने आपल्या राखीव साठ्यातून आतापर्यंतचा सर्वात मोठा तेल पुरवठा करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
Web Summary : Silver hit ₹3 lakh on MCX, while gold prices fell due to profit-booking amid global uncertainty. City-wise gold rates vary, with Chennai's silver leading at ₹3,00,100/kg. Crude oil decline and dollar weakness influence prices.
Web Summary : वैश्विक अनिश्चितता के बीच MCX पर चांदी ₹3 लाख के पार, सोने में मुनाफावसूली से गिरावट। शहरों में सोने की दरें अलग-अलग, चेन्नई में चांदी ₹3,00,100/kg। कच्चे तेल की गिरावट और डॉलर की कमजोरी का असर।