Join us
Daily Top 2Weekly Top 5

सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर जमिनीवर, Gold ₹६४२७ नं तर, Silver ₹२९,२५५ नं आपटले; पाहा नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 14:23 IST

Gold Silver Rate 2 Feb: सोन्या-चांदीचे भाव गगनावरून थेट जमिनीवर आले आहेत. लग्नसराईच्या हंगामापूर्वी दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून दिलासादायक बातमी येत आहे.

Gold Silver Rate 2 Feb: सोन्या-चांदीचे भाव गगनावरून थेट जमिनीवर आले आहेत. लग्नसराईच्या हंगामापूर्वी दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून दिलासादायक बातमी येत आहे. सराफा बाजारात आजही किमतींमध्ये मोठी खळबळ उडाली. रविवारच्या बंद भावाच्या तुलनेत, २४ कॅरेट सोन्याचे दर आज सोमवारी ६,४२७ रुपयांनी स्वस्त होऊन विना जीएसटी १,४२,२७० रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडले. तसेच चांदीच्या दरात २९,२५५ रुपयांची मोठी घसरण होऊन ती विना जीएसटी २,३६,४९६ रुपयांवर उघडली.

जीएसटीसह सोन्या-चांदीचे ताजे दर

जीएसटीसह चांदीचा भाव आता २,४३,५९० रुपये प्रति किलोवर आला आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह १,४६,५३८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. याव्यतिरिक्त प्लॅटिनमच्या दरातही ६,४६५ रुपयांची घट झाली असून तो ६३,५४० रुपयांवर पोहोचलाय. रविवारी विना जीएसटी चांदी २,६५,७५१ रुपयांवर आणि सोनं १,४८,६९७ रुपयांवर बंद झालं होतं.

बजेट २०२६ च्या घोषणेमुळे कॉफी २.५% पर्यंत महागणार; पाहा कोणकोणत्या वस्तूंसाठी खिसा करावा लागणार रिकामा

४ दिवसांत चांदी १.४९ लाखांनी स्वस्त

गेल्या ४ दिवसांत सोनं आपल्या सार्वकालिक उच्चांकी (All Time High) १,७६,१२१ रुपयांवरून ३३,८५१ रुपयांनी घसरलं. दुसरीकडे, चांदी २९ जानेवारीच्या आपल्या ३,८५,९३३ रुपये प्रति किलो या उच्चांकी स्तरावरून तब्बल १,४९,४३७ रुपयांनी स्वस्त झाली आहे. हे दर 'आयबीजेए' (IBJA) द्वारे जाहीर करण्यात आलेले दर आहेत.

कॅरेटनुसार सोन्याचे भाव (जीएसटीसह)

  • १४ कॅरेट: ३,७६० रुपयांच्या घसरणीसह आज ८३,२२८ रुपयांवर उघडले. जीएसटीसह किंमत: ८५,७२४ रुपये प्रति १० ग्रॅम.
  • १८ कॅरेट: ४,८२० रुपयांच्या मोठ्या घसरणीसह आज १,०६,७०३ रुपयांवर उघडले. जीएसटीसह किंमत: १,०९,९०४ रुपये प्रति १० ग्रॅम.
  • २२ कॅरेट: ५,८८७ रुपयांनी स्वस्त होऊन आज १,३०,३१९ रुपयांवर उघडले. जीएसटीसह किंमत: १,३४,२२८ रुपये प्रति १० ग्रॅम.
  • २३ कॅरेट: ६,४०२ रुपयांच्या घसरणीसह आज १,४१,७०० रुपयांवर उघडले. जीएसटीसह किंमत: १,४५,९५१ रुपये प्रति १० ग्रॅम.
English
हिंदी सारांश
Web Title : Gold and Silver Prices Crash in Sarafa Market: Check New Rates

Web Summary : Gold and silver prices plummeted. Gold fell by ₹6,427, silver by ₹29,255. New rates: Gold ₹1,42,270 (without GST) per 10 grams, silver ₹2,36,496 (without GST) per kg. Over four days, silver dropped ₹1.49 lakh from its high.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक