Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 12:13 IST

Gig Workers on Strike : गिग कामगारांनी ३१ डिसेंबर रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. याचा परिणाम स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट, फ्लिपकार्ट, अमेझॉन, झेप्टो आणि इतर ई-कॉमर्स कंपन्यांच्या डिलिव्हरीवर होईल.

Gig Workers on Strike : तुम्ही जर नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ऑनलाईन ऑर्डर करण्याचा विचार करत असाल तर थांबा! तुम्हाला बी प्लॅन रेडी ठेवावा लागेल. अन्यथा ऐनवेळी धावपळ होऊ शकते. कारण, ऑनलाइन प्लॅटफॉर्मसाठी काम करणाऱ्या 'गिग वर्कर्स'नी आता आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियन आणि इंडियन फेडरेशन ऑफ ॲप-बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्सने या संपाची हाक दिली असून, कामाची खालावलेली स्थिती, कमी होत जाणारी कमाई आणि सामाजिक सुरक्षेचा अभाव यांविरुद्ध आपला रोष व्यक्त केला आहे.

१० मिनिटांच्या डिलिव्हरी मॉडेलला तीव्र विरोधवर्कर्सनी केंद्र आणि राज्य सरकारांना या प्लॅटफॉर्म कंपन्यांवर कडक नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः जीव धोक्यात घालून केली जाणारी '१० मिनिटांची डिलिव्हरी' ही पद्धत त्वरित बंद करण्याची प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. २५ डिसेंबर रोजी पुकारलेल्या संपाचा परिणाम अनेक शहरांतील ऑनलाइन सेवांवर झाल्याचे दिसून येत आहे.

गिग वर्कर्सच्या ९ प्रमुख मागण्या

  • पारदर्शक वेतन : कामासाठी न्याय्य आणि पारदर्शक वेतन संरचना लागू करावी.
  • आयडी ब्लॉकिंगवर बंदी : कोणत्याही प्रक्रियेशिवाय आयडी ब्लॉक करणे आणि दंड आकारणे थांबवावे.
  • सुरक्षा साधने :  कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा गियर आणि उपाययोजना पुरवाव्यात.
  • भेदभावमुक्त काम : अल्गोरिदमच्या आधारे कामाचे वाटप करताना भेदभाव न करता सर्वांना समान संधी द्यावी.
  • सामाजिक सुरक्षा : आरोग्य विमा, अपघात विमा आणि पेन्शन यांसारख्या सामाजिक सुरक्षा कवच मिळावे.
  • कामाच्या तासांचे नियोजन : कामाच्या दरम्यान विश्रांती आणि ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त काम करून घेऊ नये.

वाचा - नवीन वर्षात गुंतवणुकीचा श्रीगणेशा! 'या' आहेत श्रीमंत करणाऱ्या टॉप ५ योजना; सुरक्षा आणि दमदार परतावा

नेमके कोण असतात 'गिग वर्कर्स'?ज्या कर्मचाऱ्यांना ठराविक पगाराऐवजी 'काम तेवढा मोबदला' या तत्त्वावर ठेवले जाते, त्यांना गिग वर्कर म्हटले जाते. याचे साधारण ५ प्रकार पडतात.

  • स्वतंत्र कंत्राटी कर्मचारी : प्रकल्पाच्या आधारावर काम करणारे.
  • ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर्कर्स : झोमॅटो, स्विगी, ओला, उबेर यांसारख्या ॲप्ससाठी काम करणारे.
  • कंत्राटी फर्मचे कर्मचारी : एजन्सीमार्फत नेमलेले.
  • ऑन-कॉल वर्कर्स : गरजेनुसार कामावर बोलावले जाणारे.
  • तात्पुरते कर्मचारी : ठराविक मुदतीसाठी नियुक्त केलेले.
English
हिंदी सारांश
Web Title : Delivery boys' nationwide strike looms over demands; online services disrupted?

Web Summary : Gig workers are striking nationwide for better conditions, fair pay, and social security. They strongly oppose 10-minute delivery models, demanding government regulation of platform companies. The strike impacts online services.
टॅग्स :झोमॅटोस्विगीऑनलाइनअ‍ॅमेझॉनफ्लिपकार्ट