LPG Gas Cylinder Booking : घरचा गॅस अचानक संपला की गृहिणींची मोठी ओढाताण होते. बुकिंग केल्यानंतर सिलेंडर येईपर्यंत वाट पाहावी लागते आणि तोपर्यंत स्वयंपाक खोळंबतो. ग्राहकांची हीच अडचण ओळखून इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने 'छोटू' नावाचा ५ किलोचा एलपीजी सिलेंडर बाजारात आणला आहे. "त्वरित गॅस हवाय? मग वाट कशाला पाहता?" या संकल्पनेवर आधारित ही सुविधा आता सर्वसामान्यांसाठी वरदान ठरत आहे.
काय आहे हा 'छोटू' सिलेंडर?'छोटू' हा इंडेन ब्रँडचा ५ किलो क्षमतेचा छोटा एलपीजी सिलेंडर आहे. हा सिलेंडर प्रामुख्याने अशा लोकांसाठी डिझाइन केला आहे ज्यांना गॅसची तातडीने गरज असते किंवा जे वारंवार स्थलांतर करतात.
या योजनेची खास वैशिष्ट्ये
- नो बुकिंग, नो वेटिंग: या सिलेंडरसाठी आगाऊ बुकिंग करण्याची गरज नाही. तुम्ही थेट दुकानावर जाऊन तो खरेदी करू शकता.
- कागदपत्रांची कटकट नाही: नियमित गॅस कनेक्शनसाठी आधार कार्ड, रेशन कार्ड आणि पत्त्याचा पुरावा लागतो. मात्र, 'छोटू'साठी कोणत्याही पत्त्याच्या पुराव्याची गरज नाही. फक्त एक ओळखपत्र पुरेसे आहे.
- कुठूनही रिफिल करण्याची सोय: हा सिलेंडर 'मुक्त व्यापार एलपीजी' श्रेणीत येतो. त्यामुळे तुम्ही एका एजन्सीकडून तो विकत घेऊन दुसऱ्या कोणत्याही अधिकृत केंद्रावरून रिफिल करू शकता.
कुठे मिळेल आणि रिफिल कसा कराल?हे छोटे सिलेंडर केवळ गॅस एजन्सीकडेच नाही, तर तुमच्या जवळच्या किराणा दुकान, पेट्रोल पंप आणि इतर अधिकृत आउटलेट्सवर सहज उपलब्ध आहेत. जेव्हा सिलेंडरमधील गॅस संपेल, तेव्हा जुना रिकामा सिलेंडर देऊन तुम्ही लगेच भरलेला नवीन सिलेंडर घेऊ शकता. डिलिव्हरी बॉयची वाट पाहण्याचे आता काम नाही.
कोणासाठी आहे हा 'छोटू' फायदेशीर?
- विद्यार्थी आणि एकटे राहणारे नोकरदार: ज्यांना कमी स्वयंपाक करावा लागतो.
- नव्याने स्थलांतरित झालेले लोक: ज्यांच्याकडे अद्याप पत्त्याचा पुरावा नाही.
- बॅकअप पर्याय: नियमित सिलेंडर संपल्यास आपत्कालीन स्थितीसाठी हा सिलेंडर उत्तम पर्याय आहे.
- महिला व ज्येष्ठ नागरिक: वजनाने हलका असल्यामुळे हा सिलेंडर हाताळण्यास अत्यंत सोपा आणि सुरक्षित आहे.
सुरक्षा आणि मानकेकमी वजन आणि साध्या डिझाइनमुळे 'छोटू' वापरणे सुरक्षित आहे. हे सिलेंडर निर्धारित सुरक्षा मानकांचे पालन करूनच तयार केले जातात. इंडियन ऑईलच्या या उपक्रमामुळे आता एलपीजी सुविधा अधिक सुलभ आणि सर्वव्यापी झाली आहे.
Web Summary : Indian Oil introduces 'Chhotu,' a 5kg LPG cylinder, solving immediate gas needs. No booking or address proof needed; refillable at various outlets, ideal for students, migrants, and emergencies. Easy and safe to use.
Web Summary : इंडियन ऑयल ने 'छोटू' 5 किलो एलपीजी सिलेंडर पेश किया, जो तत्काल गैस की जरूरत को पूरा करता है। बुकिंग या पते के प्रमाण की आवश्यकता नहीं; विभिन्न आउटलेट्स पर रिफिल करने योग्य, छात्रों, प्रवासियों और आपात स्थितियों के लिए आदर्श। उपयोग में आसान और सुरक्षित।