Join us

गीता गोपीनाथ यांनी केली भारत सरकारची प्रशंसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 02:46 IST

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये गोपीनाथ यांनी भारताला आरोग्यविषयक सुविधांसाठी अधिक खर्च करण्याचाही सल्ला दिला आहे.

नवी दिल्ली : आंतरराष्टÑीय नाणे निधीच्या मुख्य आर्थिक सल्लागार गीता गोपीनाथ यांनी कोरोनाच्या प्रतिकारासाठी भारत सरकारने केलेल्या उपायांची प्रशंसा केली आहे. लॉकडाऊनच्या काळात गरिबांना जी मदत दिली गेली त्याचे अनुकरण अन्य देशांनी करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये गोपीनाथ यांनी भारतालाआरोग्यविषयक सुविधांसाठी अधिक खर्च करण्याचाही सल्ला दिला आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याभारतआरोग्य