Join us

वायर्सनंतर अदानी रियल इस्टेट क्षेत्रातही विस्ताराच्या तयारीत, 'ही' दिग्गज कंपनी खरेदी करणार, एप्रिलपर्यंत डील पूर्ण होणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 15:22 IST

Gautam Adani News: वायर क्षेत्रात एन्ट्री घेतल्यानंतर रिअल इस्टेट क्षेत्रात गौतम अदानी समूह मोठ्या कराराच्या तयारीत आहे. एप्रिलपर्यंत हा करार पूर्ण होणे अपेक्षित आहे.

वायर क्षेत्रात एन्ट्री घेतल्यानंतर रिअल इस्टेट क्षेत्रात गौतम अदानी समूह मोठ्या कराराच्या तयारीत आहे. अदानी समूह दुबईस्थित डेव्हलपर एमार ग्रुपची भारतीय शाखा १.४ अब्ज डॉलर्सच्या संभाव्य एंटरप्राइझ व्हॅल्यूवर विकत घेण्यासाठी बोलणी करत आहे. एप्रिलपर्यंत हा करार पूर्ण होणे अपेक्षित आहे.

काय आहे प्लॅन?

इकॉनॉमिक टाइम्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अदानी समूह आणि इमार यांच्यात या व्यवहाराच्या रचनेवर चर्चा सुरू आहे. या व्यवहारात अदानींच्या लिस्टेड नसलेल्या कंपनीकडून सुमारे ४० ० दशलक्ष डॉलर्सची इक्विटी गुंतवणूक होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलपर्यंत हा करार होऊ शकतो, पण चर्चा सुरू असल्यानं कराराची शाश्वती नाही. अदानी समूह आणि एम्मार मीडियाकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. एमार इंडिया लिमिटेडमधील संभाव्य हिस्सा विक्रीबाबत अदानींसह भारतातील काही समूहांसोबत चर्चा सुरू असल्याच एमारनं जानेवारीत सांगितलं होतं.

पोर्टफोलिओचा होणार विस्तार

एमार युनिटच्या अधिग्रहणामुळे भारतात अदानींच्या रिअल इस्टेट पोर्टफोलिओचा विस्तार होईल. एम्मार इंडिया नवी दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान सह अनेक ठिकाणी निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प विकसित करीत आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार, कंपनीकडे २४ मिलियन चौरस फूट मालमत्ता आणि ६१ मिलियन चौरस फूट क्षेत्र विकसित केलं जात आहे.

ब्लूमबर्ग न्यूजनं या महिन्यात दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील सर्वात मोठ्या निवासी प्रकल्पांपैकी एक असलेल्या अदानींच्या रिअल इस्टेट युनिटनं अंदाजे ३६० अब्ज रुपयांच्या पुनर्विकासासाठी सर्वाधिक बोली लावली आहे. आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेल्या धारावीचा पुनर्विकास अदानी समूहाकडून केला जात आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडमध्ये (आता नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड) मध्ये समूहाचा ८० टक्के हिस्सा आहे, तर उर्वरित हिस्सा राज्य सरकारकडे आहे.

टॅग्स :गौतम अदानीअदानीबांधकाम उद्योग