Join us
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक ड्रायव्हर बनला 'सोशल मीडिया स्टार'! ड्रायव्हरने युट्यूबच्या पैशातून खरेदी केला ४० लाखांचा ट्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 10:15 IST

Success Story: सोशल मीडियाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्नही मिळू शकते. झारखंडमधील पंकज मधेशिया या ट्रक ड्रायव्हरने सोशल मीडियाद्वारे भरपूर कमाई केली आहे आणि ४० लाख रुपयांचा ट्रक खरेदी केला आहे.

Truck Driver Pankaj Madheshiya :सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्य लोक रात्रीतून स्टार बनलेली तुम्ही पाहिली असतील. डिजिटल युगाने जगभरातील सामान्य माणसांसाठी प्रगतीची नवनवीन दारे उघडली आहेत. झारखंडमधील प्रसिद्ध ट्रक ड्रायव्हर राजेश रवानी यांच्यानंतर आता आणखी एका ट्रक ड्रायव्हरने सोशल मीडियाच्या जोरावर आपले नशीब बदलले आहे. हजारीबागचे पंकज मद्धेशिया यांनी केवळ व्हिडिओ बनवून मिळवलेल्या उत्पन्नातून चक्क ४० लाख रुपयांचा हायटेक ट्रक खरेदी केला असून, त्यांची ही यशोगाथा सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरली आहे.

६००० रुपयांच्या पगारदाराचा संघर्षपंकज यांचा प्रवास २००७ मध्ये एका ट्रक ड्रायव्हरचा हेल्पर म्हणून सुरू झाला. त्यावेळी त्यांना महिन्याला अवघे ६००० रुपये मिळत असत. पुढे त्यांनी ट्रक चालवण्याचे कौशल्य आत्मसात केले आणि त्यांचा पगार १२,००० रुपयांपर्यंत पोहोचला. २०१७ पर्यंत १८,००० रुपये पगार झाला, मात्र लग्नानंतर वाढत्या महागाईत घर चालवणे कठीण होऊ लागले. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी टेलर गाडी घेतली, पण अचानक आलेल्या कोरोना टाळेबंदीमुळे सर्वकाही ठप्प झाले.

रिकाम्या वेळेत सुचली 'कंटेंट क्रिएशन'ची कल्पनालॉकडाऊनमध्ये रस्ते ओसाड झाले आणि काम बंद पडले. पंकज यांनी सांगितले की, रिकाम्या वेळेत ते मोबाईलवर इतरांचे 'ब्लॉग्स' पाहायचे. तिथूनच त्यांना कल्पना सुचली की आपणही ट्रक ड्रायव्हरचे आयुष्य आणि प्रवासातील अनुभव जगाला दाखवू शकतो.

सोशल मीडियावरील प्रगतीपंकज यांनी २०२३ मध्ये युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्यास सुरुवात केली. आज त्यांच्या युट्यूबवर १.५० लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. तर फेसबुकवर त्यांचे २ लाखांहून अधिक फॉलोअर्स.

४० लाखांचा हायटेक ट्रकसोशल मीडियावरून होणाऱ्या 'मोठ्या' कमाईने पंकज यांचे स्वप्न पूर्ण केले. त्यांनी ३५ ते ४० लाख रुपये किंमत असलेला एक नवीन आणि हायटेक ट्रक खरेदी केला आहे. आता पंकज केवळ मालवाहतूकच करणार नाहीत, तर आपल्या या आधुनिक ट्रकमधून जगाला 'ट्रकिंग वर्ल्ड'चा एक नवा अनुभवही देणार आहेत. झारखंडचेच प्रसिद्ध युट्युबर राजेश रवानी (ज्यांनी सोशल मीडियाच्या कमाईतून १ कोटीचे घर बांधले) यांच्या पावलावर पाऊल ठेवून पंकज यांनी ही प्रगती केली आहे.

वाचा - १५ तास काम करून १५००-१६०० रुपये कमावतो! १० मिनिटांत डिलिव्हरी थांबल्यानं डिलिव्हरी बॉयचं आयुष्य कसं बदलेल?

इतरांसाठी प्रेरणापंकज मद्धेशिया यांचे यश हे सिद्ध करते की, कष्टासोबतच जर काळाप्रमाणे बदलण्याची तयारी असेल, तर कोणतेही क्षेत्र तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकते. ट्रक चालवण्यासारख्या कष्टाच्या व्यवसायात राहूनही त्यांनी डिजिटल क्रांतीचा फायदा घेतला आणि आज ते अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Truck driver becomes social media star, buys truck from YouTube income.

Web Summary : Pankaj Madheshiya, a truck driver from Jharkhand, transformed his life through YouTube. Starting as a helper earning meagerly, he now owns a ₹40 lakh truck bought with his content creation income, inspiring many.
टॅग्स :सोशल मीडियायु ट्यूबपैसा