Suzuki Motor Former Chairman Death : भारतीय मध्यमवर्गीयांचं चारचाकी गाडीचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या अवलियाने आज जगाचा निरोप घेतला. सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष ओसामू सुझुकी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय माणूस आणि सुझुकी कंपनी यांचं अनेक वर्षांपासून अतुट नातं आहे. दुचाकीपासून चारचाकीपर्यंत सर्वाधिक गाड्या ह्या सुझुकी कंपनीच्या रस्त्यांवर धावताना दिसतात. मूळची जपानची असलेली ही कंपनी भारतीय वाटावी इतकी रुळली आहे. सुझुकी कंपनीचे एकही वाहन माहिती नसेल असा माणूस भारतात तरी शोधून सापडणार नाही. ओसामू सुझुकी यांनी ४० वर्षांहून अधिक काळ सुझुकी मोटर कॉर्पचे नेतृत्व केले. २०२१ मध्ये त्यांनी निवृत्तीची घोषणा केली. त्यावेळी त्यांचे वय ९१ वर्षे होते.
सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष ओसामू सुझुकी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ओसामू सुझुकी यांनी ४० वर्षांहून अधिक काळ सुझुकी मोटर कॉर्पचे नेतृत्व केले. २०२१ मध्ये त्यांनी निवृत्तीची घोषणा केली. त्यावेळी त्यांचे वय ९१ वर्षे होते.
ओसामू सुझुकी यांच्या निधनाची उशिरा माहितीकंपनीने शुक्रवारी २७ डिसेंबर रोजी सुझुकी मोटर कॉर्पच्या अध्यक्षांच्या मृत्यूची माहिती दिली. वास्तविक, त्यांचा मृत्यू २५ डिसेंबर रोजी झाला होता. कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार ही माहिती मिळाली आहे. ओसामू सुझुकी यांच्या नेतृत्वाखाली कंपनीचा जागतिक बाजारपेठेत विस्तार झाला. कंपनी विशेषतः तिच्या मिनी कार आणि मोटरसायकलसाठी प्रसिद्ध आहे.
ओसामू सुझुकी यांची कारकीर्दसुझुकी यांचा जीवन प्रवास एका सामान्य कुटुंबातून सुरू झाला. ओसामू सुझुकी यांचा जन्म ३० जानेवारी १९३० रोजी जपानच्या गेरो-गिफू प्रीफेक्चरमध्ये झाला. टोकियोमधील चाओ विद्यापीठात कायद्याची पदवी घेत असताना, त्यांनी उदरनिर्वाह करण्यासाठी कनिष्ठ हायस्कूलमध्ये शिक्षक आणि नाईट गार्ड म्हणून काम केले. १९५३ मध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांनी सुरुवातीला बँकेत नोकरी केली, पण नंतर लग्न करून ते सुझुकी कौटुंबिक व्यवसायात सामील झाले. हा टर्निंग पॉइंट त्याच्या ६ दशकांच्या कारकिर्दीची सुरुवात ठरला.
१९५८ मध्ये सुझुकी मोटर कॉर्पमध्ये रुजूओसामू सुझुकी १९५८ मध्ये सुझुकी मोटर कॉर्पमध्ये सामील झाले आणि १९७८ मध्ये तिचे अध्यक्ष झाले. अध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ एकूण २८ वर्षांचा होता. ते या जागतिक ऑटोमेकरचे प्रमुख म्हणून सर्वाधिक काळ राहिले. अध्यक्ष ओसामू सुझुकी यांच्या कार्यकाळात कंपनीने अनेक महत्त्वाचे विस्तार केले.