Join us

सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांना क्लीनचिट! हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये करण्यात आले होते गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 20:11 IST

Madhabi Puri Buch News: भारतीय शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणारी संस्था सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (SEBI) माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांना मोठ्या आणि गंभीर आरोपांतून क्लीनचिट मिळाली आहे. 

सेबी या भारतातील एका महत्त्वाच्या संस्थेच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांच्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सेबीच्या प्रमुख म्हणून कार्यरत असताना माधबी पुरी बुच यांच्यावर आर्थिक प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात त्यांना लोकपालांनी क्लीनचिट दिली आहे. सेबीच्या माजी अध्यक्षांवरील आरोप निराधार असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांच्या हिंडेनबर्ग रिपोर्टने गंभीर आरोप केले होते. या आरोपांमध्ये सगळ्यात मोठा आरोप हा होता की, त्यांचे अदानी समूहासोबत संबंध आहेत. पण आता त्यांना भारताच्या लोकपालांनी क्लिनचीट दिली आहे. 

माधबी पुरी बुच यांच्यावरील आरोपाबद्दल काय म्हटलंय?

लोकपालांनी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सादर करण्यात आलेली साक्ष आणि कायद्याच्या कसोटीवर ही तक्रार टिकणारी नाही. आणि त्यातून कोणताही गुन्हा किंवा तपास केला पाहिजे असे सिद्ध होत नाही. 

वाचा >>IPO गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी, आता शेअर्स लिस्ट होण्यापूर्वीच विकता येणार; जाणून घ्या

माधबी पुरी बुच या २०१७ मध्ये सेबीमध्ये कार्यरत झाल्या होत्या. मार्च २०२२ मध्ये त्यांना सेबीच्या अध्यक्षा म्हणून नेमण्यात आले होते. कार्याकाळ संपल्यानंतर त्या निवृत्त झाल्या. त्यांच्या जागी आता तुहिन कांत पाडे हे सेबीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. 

कोणते आरोप करण्यात आले होते?

सेबीच्या अध्यक्षा असताना माधबी पुरी बुच यांच्यावर हिंडनबर्ग रिपोर्टमधून आरोप करण्यात आले होते. अदानी समूहाच्या परदेशी गुंतवणूक फंडामध्ये माधबी पुरी बुच आणि त्यांच्या पतीचा हिस्सा असल्याचे आरोप या रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. अदानी समूह आणि सेबी अध्यक्षा यांच्यात मिलीभगत असल्याचेही या रिपोर्टमध्ये म्हटले गेले होते. 

टॅग्स :सेबीमाधबी पुरी बुचअदानीशेअर बाजार