Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पापूर्वी सरकारने दिली गुड न्यूज; EPFOच्या 7 कोटी सदस्यांना मिळणार वाढीव व्याज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 21:48 IST

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.

EPFO Interest Rate : देशातील 7 कोटी EPFO ​​सदस्यांसाठी मोठी बातमी आली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गुरुवारी(दि.11) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) ठेवींच्या व्याजात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्येच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 8.25 टक्के व्याजदर जाहीर केला होता, ज्याला आता वित्त मंत्रालयाने मान्यता दिली आहे.

गेल्या वर्षीचा व्याजदर 8.15% होता, तर या वर्षी फेब्रुवारीमध्ये EPFO ने 2023-24 साठी 8.25% व्याजदर जाहीर केला होता. आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर माहिती देताना, EPFO ​​ने सांगितले की, EPF सदस्यांसाठी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी जाहीर केलेल्या 8.25% व्याजदराला सरकारने मंजुरी दिली आहे. 

फेब्रुवारीमध्ये व्याज वाढवण्याची घोषणा केंद्रीय विश्वस्त मंडळ (CBT), या  EPFO च्या सर्वोच्च संस्थेने फेब्रुवारीमध्ये 2023-24 या आर्थिक वर्षासाठी PF वर व्याज वाढवण्याची घोषणा केली होती. पीएफवरील व्याज वार्षिक 8.15 टक्क्यांवरून 8.25 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. CBT च्या निर्णयानंतर, 2023-24 साठी EPF ठेवींवरील व्याजदर संमतीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता, ज्याला आज मान्यता देण्यात आली आहे.

व्याज कधी मिळते?EPFO ​​खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यावर दरवर्षी व्याजदर जाहीर करते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत सुमारे 7 कोटी कर्मचारी नोंदणीकृत आहेत. EPFO ने व्याजाचा निर्णय घेतल्यानंतर वित्त मंत्रालय अंतिम निर्णय घेते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यावरील व्याज वर्षातून एकदा 31 मार्च रोजी दिले जाते.

टॅग्स :केंद्र सरकारकेंद्रीय अर्थसंकल्प 2019भाजपानिर्मला सीतारामन