नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडून (ईपीएफओ) भविष्य निर्वाह निधीवरील (ईपीएफ) २०२०-२१ या वर्षातील व्याज येत्या दिवाळीच्या आधीच दिले जाण्याची शक्यता आहे. याचा ईपीएफओच्या ६ कोटींपेक्षा अधिक सदस्यांना लाभ होईल.उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, वित्त वर्ष २०२०-२१ साठी ईपीएफओने व्याजदर ८.५ टक्के कायम ठेवण्याचा निर्णय आधीच घोषित केला आहे. कोविड-१९ साथीच्या काळात ईपीएफमधून मोठ्या प्रमाणात निधी काढण्यात आला. त्या तुलनेत योगदान मात्र कमी जमा झाले आहे. लोक अजूनही अडचणीत आहेत. जूनच्या आधीपासून ईपीएफवरील व्याज जमा केले जाणार असल्याच्या बातम्या येत आहेत. तथापि, ते अजूनही जमा झालेले नाही. किमान दिवाळीपूर्वी तरी ते जमा करण्यात यावे, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत होती. २०१९-२० मध्ये कोरोनामुळे ईपीएफवरील व्याजदर ८.६५ टक्क्यांवरून ८.५ टक्के करण्यात आला होता. २०२०-२१ साठीही हाच दर कायम ठेवण्याचा निर्णय झालेला <आहे.
EPF interest: दिवाळीपूर्वी जमा होऊ शकते ईपीएफचे व्याज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 11:44 IST