Join us

महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 06:49 IST

विशेष म्हणजे, एखाद्या मोठ्या भारतीय उद्योगसमूहाकडून कारखान्यातील कामगारांनाही शेअर्स देण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. हे शेअर्स ‘रिस्ट्रिक्टेड स्टॉक युनिट्स’ (RSUs) स्वरूपात दिले जातील.

नवी दिल्ली : महिंद्रा अँड महिंद्रा समूहाने पहिल्यांदाच आपल्या कारखान्यातील मजुरांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना खास बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. कंपनी सुमारे २३,००० कर्मचाऱ्यांना ‘एम्प्लॉयी स्टॉक ओनरशिप प्लॅन’ (ESOP) देणार असून, त्याची किंमत ४०० ते ५०० कोटी रुपयांपर्यंत असेल.

ग्रुप सीईओ आणि एमडी अनिश शाह यांनी सांगितले की, या माध्यमातून कंपनीच्या वाढीमध्ये कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान केला जात आहे. यात महिंद्राच्या तीन मोठ्या उपकंपन्या, महिंद्रा अँड महिंद्रा, महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल व महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटी यांचा समावेश असेल.

विशेष म्हणजे, एखाद्या मोठ्या भारतीय उद्योगसमूहाकडून कारखान्यातील कामगारांनाही शेअर्स देण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. हे शेअर्स ‘रिस्ट्रिक्टेड स्टॉक युनिट्स’ (RSUs) स्वरूपात दिले जातील. 

टॅग्स :महिंद्राशेअर बाजारकर्मचारी