Join us

शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 10:58 IST

elon musk starlink : इलॉन मस्क यांची सॅटेलाइट इंटरनेट स्टारलिंक आता श्रीलंकेतही दाखल झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये स्टारलिंकला श्रीलंकेत काम करण्यासाठी आवश्यक मान्यता देण्यात आली होती. आता ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

elon musk starlink : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सने चालवलेली स्टारलिंक सेवा आता श्रीलंकेत अधिकृतपणे सुरू झाली आहे. हाय-स्पीड सॅटेलाइट इंटरनेट सेवा दक्षिण आशियामध्ये विस्तारण्यासाठी हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. यापूर्वी स्टारलिंकने भूतान आणि बांगलादेशमध्येही आपली सेवा सुरू केली आहे. किती महाग आहे? भारतात कधी येणार? चला जाणून घेऊया.

स्टारलिंकने आपल्या X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून ही घोषणा करताना म्हटले आहे की, "श्रीलंकेत आता हाय-स्पीड, कमी 'विलंब' असलेले इंटरनेट उपलब्ध आहे!" ही सेवा ६,७५० पेक्षा जास्त लो-अर्थ ऑर्बिट (LEO) उपग्रहांवर आधारित आहे, जे पारंपरिक उपग्रहांपेक्षा खूप वेगवान आणि कमी 'विलंब' असलेले इंटरनेट कनेक्शन देते.

ग्रामीण श्रीलंकेत बदल घडणारश्रीलंकेसारख्या विकसनशील देशांसाठी, विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागांसाठी, जिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी ही नेहमीच मोठी समस्या राहिली आहे, तिथे स्टारलिंक हे तंत्रज्ञान खूप महत्त्वाचे ठरणार आहे. स्टारलिंकच्या आगमनामुळे शिक्षण, टेलिमेडिसिन (दूरवरून वैद्यकीय सल्ला) आणि स्थानिक व्यवसायांना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. श्रीलंकेच्या सरकारने स्टारलिंकला तात्काळ परवानगी दिल्याने, ते डिजिटल पायाभूत सुविधांसाठी किती गंभीर आहेत हे दिसून येते.

भारतात काय परिस्थिती आहे?आपले शेजारी देश स्टारलिंक सेवेचा फायदा घेत असताना, स्टारलिंकला भारतात अजूनही काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरीही, अलीकडे यात थोडी प्रगती झाली आहे. भारत सरकारने स्टारलिंकला GMPCS (ग्लोबल मोबाइल पर्सनल कम्युनिकेशन बाय सॅटेलाइट) परवाना दिला आहे. आता फक्त IN-SPACE कडून अंतिम मंजुरी आणि स्पेक्ट्रम वाटपाची प्रक्रिया बाकी आहे.

केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी संकेत दिले आहेत की, जर सुरक्षा आणि डेटा स्थानिककरणाच्या अटी पूर्ण झाल्या, तर स्टारलिंक सेवा पुढील दोन महिन्यांत भारतात सुरू होऊ शकते.

स्टारलिंकची भारतात आणि श्रीलंकेत अपेक्षित किंमतभारतात स्टारलिंकची किंमत:

  1. स्टँडर्ड किटची किंमत : सुमारे ३३,००० रुपये (यात डिश अँटेना, स्टँड, वाय-फाय राउटर आणि केबल्स समाविष्ट असतील).
  2. मासिक सदस्यता शुल्क : ३,००० ते ४,२०० रुपये (अंदाजे ३६ ते ५० डॉलर) दरम्यान असण्याची शक्यता आहे.

श्रीलंकेत स्टारलिंकची किंमत

  • स्टारलिंकच्या वेबसाइटनुसार, श्रीलंकेत दोन प्रकारचे प्लॅन सुरू झाले आहेत.
  • रेसिडेन्शियल लाइट प्लॅन: कमी डेटा वापरणाऱ्या आणि लहान घरांसाठी.
  • मासिक शुल्क: १२,००० श्रीलंकेचे रुपये (जे भारतीय रुपयांमध्ये सुमारे ३,४२५ रुपये आहेत).

वाचा - Bank of Baroda मध्ये जमा करा २,००,००० रुपये; मिळेल, ₹४७,०१५ चं फिक्स व्याज आणि हमीही, जाणून घ्या

यावरून असा अंदाज लावला जात आहे की, भारतातही स्टारलिंकची मासिक किंमत सुमारे साडेतीन हजार रुपयांपासून सुरू होऊ शकते. भारताला स्टारलिंक सेवेची अजून प्रतीक्षा असली तरी, श्रीलंकेत या सेवेमुळे मोठे बदल अपेक्षित आहेत.

टॅग्स :एलन रीव्ह मस्कइंटरनेट५जी