Elon Musk Net Worth: इलॉन मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले असून 'फोर्ब्स'नुसार त्यांची एकूण संपत्ती ८५० अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये त्यांनी पहिल्यांदाच ८०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला असून, यापूर्वी कोणत्याही व्यक्तीला इतकी संपत्ती मिळवता आलेली नाही. टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि स्पेसएक्सचे संस्थापक असलेल्या मस्क यांची संपत्ती ज्या वेगाने वाढत आहे, ते पाहता ते लवकरच जगातील पहिले ट्रिलियनेअर (१००० अब्ज डॉलर्सचे मालक) बनू शकतात.
फोर्ब्सच्या अहवालानुसार, त्यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा स्पेसएक्स आणि xAI मधून येत आहे. नुकतेच स्पेसएक्सनं xAI विकत घेतलं असून, या व्यवहारामुळे या दोन्ही कंपन्यांचे एकत्रित मूल्य १.२५ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचलंय. या विलीन झालेल्या कंपनीत मस्क यांची सुमारे ४३ टक्के भागीदारी आहे, ज्याचं मूल्य ५४२ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. या एका व्यवहारामुळे त्यांच्या संपत्तीत ८४ अब्ज डॉलर्सची भर पडली असून, आता स्पेसएक्स त्यांच्या एकूण संपत्तीचा सुमारे दोन तृतीयांश हिस्सा आहे.
जगातील इतर दिग्गज श्रीमंतांना टाकलं मागे
इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती आता इतकी वाढली आहे की, ती जगातील पुढील तीन सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या एकत्रित संपत्तीपेक्षाही जास्त आहे. गुगलचे सह-संस्थापक लॅरी पेज (२५१ अब्ज डॉलर्स), सर्गेई ब्रिन (२३१ अब्ज डॉलर्स) आणि मेटाचे मार्क जुकरबर्ग (२१९ अब्ज डॉलर्स) या तिघांची एकूण संपत्ती जोडली तरी ती मस्क यांच्या संपत्तीपेक्षा कमी होते. मस्क यांच्या संपत्तीचा प्रवास थक्क करणारा आहे; २०२१ मध्ये ते ३०० अब्ज डॉलर्सवर होते, त्यानंतर २०२४ च्या अखेरीस ४०० अब्ज आणि २०२५ मध्ये त्यांनी ५००, ६०० व ७०० अब्ज डॉलर्सचे टप्पे पार करत फेब्रुवारी २०२६ मध्ये ८०० अब्ज डॉलर्सच्या पुढे झेप घेतली. टेस्लामध्ये त्यांची १२ टक्के भागीदारी असली तरी सध्या स्पेसएक्स आणि xAI मधून त्यांना अधिक कमाई होत आहे.
ट्रिलियनेअर बनण्याच्या उंबरठ्यावर मस्क
मस्क अतिशय वेगाने ट्रिलियनेअर बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. 'हिंदुस्तान टाइम्स'च्या अहवालानुसार, 'कलशी' नावाच्या प्रेडिक्शन मार्केटमधील ७५ टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, २०२६ मध्येच ते ट्रिलियनेअर होतील. तर ८६ टक्के ट्रेडर्सच्या मते हे २०२७ पर्यंत शक्य होईल. ९१ टक्के लोकांना वाटतं की २०२९ पूर्वी ते निश्चितपणे या टप्प्यावर पोहोचतील. स्पेसएक्स आणि xAI चं वाढतं मूल्य हे यामागील मुख्य कारण आहे.
टेस्ला, स्पेसएक्स, xAI आणि एक्स सारख्या कंपन्या चालवणारे मस्क अमेरिकेतही अत्यंत प्रभावशाली आहेत. त्यांची बहुतांश संपत्ती शेअर्समध्ये असून रोख स्वरूपात नसल्यानं ते स्वतःला 'कॅश पुअर' म्हणतात. असं असूनही त्यांच्या यशानं जगभरातील लोक प्रभावित आहेत आणि भारतातील लोकही त्यांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात फॉलो करतात. स्पेसएक्स-xAI विलीनीकरणामुळे मिळालेल्या गतीमुळे मस्क यांचं ट्रिलियन डॉलरचं लक्ष्य लवकरच पूर्ण होऊ शकतं.
Web Summary : Elon Musk's net worth hits $850 billion, fueled by SpaceX and xAI. Merged entity valued at $1.25 trillion. He may soon become the world's first trillionaire, surpassing other billionaires like Larry Page and Mark Zuckerberg.
Web Summary : एलन मस्क की संपत्ति 850 बिलियन डॉलर तक पहुंची, जिसका कारण स्पेसएक्स और एक्सएआई हैं। विलय इकाई का मूल्य 1.25 ट्रिलियन डॉलर है। वह जल्द ही लैरी पेज और मार्क जुकरबर्ग जैसे अरबपतियों को पछाड़कर दुनिया के पहले ट्रिलियनेयर बन सकते हैं।