Join us

Twitter Logo : ट्विटरच्या इतिहासातील मोठा बदल, Elon Musk यांनी बदलला लोगो; ‘ब्लू बर्ड’च्या जागी दिसू लागला ‘Doge’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 08:32 IST

मस्क यांनी मंगळवारी सकाळी ट्विटरच्या इतिहासातील सर्वात मोठा बदल करून लोकांना आश्चर्याचा धक्का दिला.

ट्विटरचे(Twitter) सीईओ एलोन मस्क (Elon Musk) हे त्यांच्या आश्चर्यकारक निर्णयांसाठी ओळखले जातात. दरम्यान, मस्क यांनी मंगळवारी सकाळी ट्विटरच्या इतिहासातील सर्वात मोठा बदल करून लोकांना आश्चर्याचा धक्का दिला. यावेळी इलॉन मस्क यांनी ट्विटरवरील आयकॉनिक ब्लू-बर्ड (Blue-bird) काढून त्याजागी Doge चा फोटो लावला. ट्विटरचा हा लोगो पाहून लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. दरम्यान, हा बदल ट्विटरच्या वेब पेजवर दिसून येत आहे. तसंच युझर्सच्या ट्विटर मोबाईल ॲपवर मात्र ब्लू बर्डच दिसत आहे.

इलॉन मस्क यांनी २६ मार्च २०२२ चा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. त्यात त्यांचं आणि एक निनावी खात्यातील व्यक्ती यांच्यात संभाषण झालं होतं. यामध्ये ब्लू बर्ड लोगो ‘डॉज’मध्ये बदलण्याची मागणी करण्यात आली होती. हाच स्क्रीनशॉट शेअर करत मस्क यांनी ‘आश्वासन दिल्याप्रमाणे’ असं म्हटलं आहे.

मजेशीर पोस्ट शेअर

ट्विटरच्या लोकांमध्ये बदल केल्यानंतर इलॉन मस्क यांनी एक मजेदार पोस्ट शेअर केली आणि आपल्या अकाउंटवर डॉज मीम सह मजेशीर ट्वीट शेअर केलं. यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स तपासत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या हातात ट्विटरचा ब्लू बर्डचा फोटो आहे आणि गाडीत बसलेला डॉज 'हा जुना फोटो आहे' असे म्हणत असल्याचं दाखवण्यात आलंय.

काय आगे डॉज इमेज?डॉज इमेज हे शिबू इनू तसंच डॉजकॉइन ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सीचे सिम्बॉल आणि लोगो आहे. २०१३ मध्ये एक विनोद म्हणून अन्य क्रिप्टोकरन्सीसमोर ते लाँच करण्यात आलं.

टॅग्स :ट्विटरएलन रीव्ह मस्क