Elon Musk: दिग्गज उद्योगपती इलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. एअरोस्पेस कंपनी स्पेसएक्स (SpaceX) ने मस्क यांचीच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सोशल मीडिया फर्म xAI विकत घेतल्यानंतर, त्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. या मर्जरनंतर मस्क यांची एकूण नेटवर्थ 800 अब्ज डॉलर्स (सुमारे 72.37 लाख कोटी रुपये) च्या पुढे गेली आहे.
एकत्रित मूल्य 1.25 ट्रिलियन डॉलर
फोर्ब्सच्या माहितीनुसार, SpaceX आणि xAI या दोन्ही कंपन्यांच्या मर्जरनंतर त्यांचे एकत्रित मूल्य तब्बल 1.25 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे. या घडामोडीमुळे मस्क यांच्या संपत्तीत सुमारे 84 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. सध्या त्यांची एकूण नेटवर्थ अंदाजे 852 अब्ज डॉलर्स (सुमारे 77.07 लाख कोटी रुपये) असल्याचे सांगितले जात आहे.
SpaceX–xAI डीलमुळे वाढली मस्क यांची संपत्ती
मर्जरपूर्वी मस्क यांच्याकडे SpaceX मधील सुमारे 42 टक्के हिस्सा होता. डिसेंबरमध्ये झालेल्या टेंडर ऑफरनंतर SpaceX चे मूल्य 800 अब्ज डॉलर्स झाले होते, ज्यामध्ये मस्क यांच्या हिस्स्याची किंमत सुमारे 336 अब्ज डॉलर्स इतकी होती. तर, xAI मध्ये त्यांचा सुमारे 49 टक्के हिस्सा होता. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या प्रायव्हेट फंडरेजिंगनंतर xAI चे मूल्य 250 अब्ज डॉलर्स झाले, ज्यामुळे मस्क यांच्या हिस्स्याची किंमत सुमारे 122 अब्ज डॉलर्सवर पोहोचली.
मर्जरनंतर SpaceX चे मूल्य 1 ट्रिलियन डॉलर, तर xAI चे मूल्य 250 अब्ज डॉलर्स इतके झाले आहे. फोर्ब्सच्या अंदाजानुसार, या नव्या एकत्रित कंपनीत मस्क यांचा सुमारे 43 टक्के हिस्सा असून, त्याचे मूल्य जवळपास 542 अब्ज डॉलर्स आहे.
मर्जरमागील रणनीती काय?
स्पेस ट्रान्सपोर्टेशन आणि कम्युनिकेशन क्षेत्रातील SpaceX आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअप xAI यांचे एकत्रीकरण अंतराळातील AI कंप्युटिंग क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहे. या योजनेनुसार, अंतराळात मोठ्या प्रमाणावर सॅटेलाइट्स पाठवले जाणार असून, तेथे डेटा सेंटरप्रमाणे काम करतील. विशेष म्हणजे, एका वर्षापेक्षाही कमी कालावधीत मस्क यांनी आपल्या दोन कंपन्यांचे दुसऱ्यांदा मर्जर केले आहे. मागील वर्षी मार्चमध्ये त्यांनी आपल्या AI स्टार्टअप xAI चे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) सोबत मर्जर केले होते.
Web Summary : Elon Musk's net worth soared past $800 billion after SpaceX acquired xAI. The merger values the combined entity at $1.25 trillion, boosting Musk's fortune by $84 billion. The strategy aims to enhance AI computing capabilities in space using satellites.
Web Summary : स्पेसएक्स द्वारा एक्सएआई के अधिग्रहण के बाद एलन मस्क की संपत्ति 800 अरब डॉलर से अधिक हो गई। विलय के बाद संयुक्त इकाई का मूल्य 1.25 ट्रिलियन डॉलर है, जिससे मस्क की संपत्ति में 84 अरब डॉलर की वृद्धि हुई। इस विलय का उद्देश्य अंतरिक्ष में एआई कंप्यूटिंग क्षमताओं को बढ़ाना है।