Join us

इलेक्ट्रिक बस तयार करते कंपनी, ३ महिन्यांत ३ पट नफा; वर्षभरात गुंतवणूकदारांचे पैसे डबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 16:03 IST

इलेक्ट्रिक बस तयार करणारी कंपनी ओलेक्ट्रा ग्रीनटेक बद्दल एक आनंदाची बातमी आली आहे.

इलेक्ट्रिक बस तयार करणारी कंपनी ओलेक्ट्रा ग्रीनटेक (Olectra Greentech) बद्दल एक आनंदाची बातमी आली आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीला मोठा नफा झाल्याची माहिती समोर आलीये. सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करताना, कंपनीच्या निव्वळ नफ्यात तीन पटीनं वाढ झाल्याची माहिती कंपनीनं शेअर बाजाराला दिली आहे. कंपनीला सतत मिळत असलेल्या नवीन आणि मोठ्या ऑर्डर्सचा परिणाम तिच्या नफ्यावर होत आहे आणि यासोबतच ऑलेक्ट्रा ग्रीनटेकचे शेअर्स देखील गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवत आहेत.३०७ कोटींचा महसूलओलेक्ट्रा ग्रीनटेकनं सप्टेंबर तिमाहीचे निकाल (Olectra Q2 Results) जाहीर करताना, कंपनीचा निव्वळ नफा (Olectra Greentech Net Profit) आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीत 18.58 कोटी रुपयांपर्यंत वाढला असल्याचं म्हटलं. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला 7.42 कोटी रुपयांचा नफा झाला होता. यासोबतच कंपनीचं उत्पन्नही तिमाही कालावधीत 307.16 कोटी रुपये झालं आहे, जे मागील वर्षी याच कालावधीत 177.34 कोटी रुपये होतं.शेअरवर काय परिणाम?निकालाचा परिणाम सोमवारी शेअर्सवर दिसून आला होता. सोमवारी कामकाजाच्या अखेरीस शेअर 0.79 टक्क्यांच्या वाढीसह 1186 रुपयांवर बंद झाला. तर मंगळवारी यात घसरण दिसून आली. कामकाजाच्या अखेरिस कंपनीचा शेअर 1,164.50 रुपयांवर बंद झाला.(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारइलेक्ट्रिक कार / स्कूटर