Join us

Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 11:59 IST

Gensol Engineering: सक्तवसुली संचालनालयाने (ED) जेनसोल इंजिनीअरिंग लिमिटेडवर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, कंपनीचे सहप्रवर्तक पुनीत सिंग जग्गी यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आलीये.

Gensol Engineering: सक्तवसुली संचालनालयाने (ED) जेनसोल इंजिनीअरिंग लिमिटेडवर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, कंपनीचे सहप्रवर्तक पुनीत सिंग जग्गी यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आलीये. कंपनीवर पैसे डायव्हर्ट करणं, कर्जाचा गैरवापर करणं आणि संबंधित पक्षाद्वारे आपल्या स्टॉकमध्ये ट्रेड फायनान्स करण्याचा आरोप ठेवण्यात आहे.

पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार ईडीनं पुनीत जग्गी यांना दिल्लीतील एका हॉटेलमधून ताब्यात घेतलं आहे, तर अनमोल जग्गी हे दुबईत असल्याचं सांगितलं जात आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींनुसार दिल्ली, गुरुग्राम आणि अहमदाबाद येथील कंपनीच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.

काय आहे प्रकरण?

सेबीने १५ एप्रिल रोजी जारी केलेल्या अंतरिम आदेशानंतर जेनसोल इंजिनीअरिंग आणि त्याचे प्रवर्तक अनमोल सिंग जग्गी आणि पुनीत सिंग जग्गी वादात सापडले आहेत. दोघांवर कंपनीच्या निधीचा गैरवापर करून लक्झरी आयुष्य जगत असल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोघांवरही शेअर बाजारातून बंदी घालण्यात आली आहे. हे बंधू इलेक्ट्रिक कॅब सेवा कंपनी ब्लूस्मार्टचे सहसंस्थापक आहेत.

शेअर्सची स्थिती काय?

जेनसोल इंजिनीअरिंगचा शेअर २४ एप्रिलरोजी ४.९६ टक्क्यांनी घसरून ९५.८० रुपयांवर आला. कंपनीच्या शेअर्सच्या किमतीचा इतिहास पाहिला तर गेल्या आठवडाभरात त्यात १८.४७ टक्क्यांची घसरण झाली आहे. शेअरच्या किंमतीत १ महिन्यात ५७.६३ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. गेल्या ३ महिन्यांत कंपनीचे शेअर्स ८६.७० टक्क्यांनी घसरले आहेत. या वर्षी आतापर्यंत शेअर्सनं ८७.३७ टक्के निगेटिव्ह परतावा दिलाय. गेल्या वर्षभरात त्यात ९० टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या ३ वर्षात कंपनीचे शेअर्स ३३.०८ टक्क्यांनी घसरले आहेत.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :व्यवसायअंमलबजावणी संचालनालयसेबी