भारतीय अर्थव्यवस्थेला गेल्या चाळीस वर्षांतील सर्वात मोठा फटका बसला असून आर्थिक वर्ष २०२१ मध्ये भारताच्या जीडीपीमध्ये उणे ७.३ टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या वर्षाच्या चौथ्या तिमाहिमध्ये मात्र जीडीपीमध्ये १.६ टक्क्यांची वाढ झाली. यावरून आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली असून, सरकारने आता आपल्या चुका स्वीकाराव्यात आणि विरोधकांचे ऐकावं, असं म्हटलं होतं. दरम्यान, यानंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी चिदंबरम यांच्यावर पलटवार केला आहे. "कोरोनाच्या संकटातही काँग्रेसकडून राजकारण सुरू आहे. काँग्रेसच्या नेतृत्वानं हा दृष्टीकोन आत्मसाद केला असून त्यालाच आपलं हत्यार बनवलं आहे. जागतिक संकटामध्ये ही वेळ नक्कीच कठीण आहे. परंतु भारतीय अर्थव्यवस्था आता मजबूत आहे. माजी अर्थमंत्र्यांनी कठीण आकड्यांकडे का दुर्लक्ष केलं याची कल्पना नाही," असं ठाकुर म्हणाले. "आपली अर्थव्यवस्था एखाद्या द्वीपाप्रमाणे निराळी आहे का? या महासाथीमुळे अनेक प्रमुख अर्थवस्थांवर परिणाम झाला नाही का? फ्रान्स, जर्मनी, इटली, युकेच्या अर्थव्यवस्थांमध्ये अनुक्रमे ८.२ टक्के, ४.९ टक्के, ८.९ टक्के आणि ९.९ टक्क्यांची घसरण झाली आहे हे तुम्हाला माहित नाही का? कॅनडा, रशिया, दक्षिण आफ्रिका, अमेरिका यांसारख्या देशांच्या जीडीपीमध्येही घरसर झाली आहे," असं चिदंबरम यांना प्रतुत्तर देताना ठाकुर म्हणाले.
GDP वरून अनुराग ठाकुरांचा चिदंबरम यांच्यावर पलटवार; म्हणाले, "आकड्यांची हेराफेरी करणं अयोग्य"
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 21:25 IST
Anurag Thakur On P Chidambaram : विरोधकांचंही ऐकावं असं म्हणत चिदंबरम यांनी जीडीपीच्या मुद्द्यावरून सरकावर साधला होता निशाणा. अनुराग ठाकुर यांचा चिदंबरम यांच्यावर पलटवार.
GDP वरून अनुराग ठाकुरांचा चिदंबरम यांच्यावर पलटवार; म्हणाले, आकड्यांची हेराफेरी करणं अयोग्य
ठळक मुद्दे विरोधकांचंही ऐकावं असं म्हणत चिदंबरम यांनी जीडीपीच्या मुद्द्यावरून सरकावर साधला होता निशाणा. अनुराग ठाकुर यांचा चिदंबरम यांच्यावर पलटवार.