Gold Silver Price Today 23 March IBJA: सोमवारी सोन्या आणि चांदीच्या किमतीत मोठा बदल पाहायला मिळाला आहे. 'इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन' (IBJA) नुसार, आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १,३५,१४१ रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. गेल्या शुक्रवारी हा दर १,४७,२१८ रुपये प्रति १० ग्रॅम होता, म्हणजेच आज सोनं १२,०७७ रुपयांनी स्वस्त झालं आहे.
२२ कॅरेट सोन्याबद्दल बोलायचं झालं तर, आज हा दर १,३४,६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला असून यात १२,०२८ रुपयांची घसरण झाली आहे. शुक्रवारी याची किंमत १,४६,६२८ रुपये होती.
PM Internship Scheme: नियमांमध्ये मोठे बदल, आता तरुणांना मिळणार अधिक संधी; पाहा डिटेल्स
१८ कॅरेट सोन्याचे दर
१८ कॅरेट सोन्याचा दर आज सोमवारी १,२३,७८९ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. यापूर्वीचा बंद भाव १,३४,८५२ रुपये होता, म्हणजेच यात ११,०६३ रुपयांची घट झाली आहे. दुसरीकडे, bullions.co.in नुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली असून ते १,४५,५२० रुपये प्रति १० ग्रॅम दरानं विकलं जात आहे.
आजचा चांदीचा भाव
IBJA च्या आकडेवारीनुसार, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीची किंमत २,०१,५०० रुपये आहे. गेल्या शुक्रवारी चांदी २,३२,३६४ रुपये प्रति किलो दरानं विकली जात होती. म्हणजेच आज चांदीच्या दरात ३०,८६४ रुपये प्रति किलोची घसरण झाली. दरम्यान, bullions.co.in वर चांदी २,२७,९६० रुपये प्रति किलो दरानं विकली जात असून तिथं हलकी वाढ दिसून येत आहे. IBJA दिवसातून दोनदा सोन्या-चांदीचे दर जाहीर करते.
Web Summary : Gold and silver prices witness a major drop. Gold fell by ₹12,077 per 10 grams, while silver plummeted by ₹30,864 per kg, according to IBJA. Slight increases are seen on bullions.co.in.
Web Summary : सोने और चांदी की कीमतों में भारी गिरावट देखी गई। आईबीजेए के अनुसार, सोना ₹12,077 प्रति 10 ग्राम गिर गया, जबकि चांदी ₹30,864 प्रति किलो गिर गई। bullions.co.in पर मामूली वृद्धि देखी गई।