Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात भूकंप; ₹१३,००० नं आपटले चांदीचे दर; Gold च्या दरातही मोठी घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 14:23 IST

Gold Silver Price On Gudi Padwa 2026: सोने आणि चांदीच्या भावात आज गुरुवारी मोठा बदल पाहायला मिळाला आहे. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर.

Gold Silver Price On Gudi Padwa 2026: सोने आणि चांदीच्या भावात आज गुरुवारी मोठा बदल पाहायला मिळाला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५१,६३७ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. बुधवारी हा दर १,५४,८७९ रुपये होता, म्हणजेच आज सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ३२४२ रुपयांची घट झाली आहे. २२ कॅरेट सोन्याचा विचार केल्यास, आज हा दर १,५१,०३० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला असून यात ३,२२९ रुपयांची घसरण झाली आहे; बुधवारी याची किंमत १,५४,२५९ रुपये होती.

१८ कॅरेट सोन्याचा भाव आज गुरुवारी प्रति १० ग्रॅम १,३८,८९९ रुपये आहे, जो गेल्या सत्रात १,४१,८६९ रुपये होता; म्हणजेच यामध्ये २,९७० रुपयांची कपात झाली आहे. दरम्यान, bullions.co.in नुसार २४ कॅरेट सोन्याच्या दरात ४३५० रुपयांची मोठी घसरण होऊन ते १,४९,४५० रुपये प्रति १० ग्रॅमवर विकलं जात आहे.

"गरीबांना शिक्षा देऊन बँका नफा कमवताहेत," मिनिमम बॅलन्स पेनल्टीवर काय म्हणाले राघव चड्ढा

चांदीच्या किमतीतही मोठी पडझड

आयबीजेएच्या (IBJA) आकडेवारीनुसार, चांदीच्या किमतीतही आज मोठी घसरण पाहायला मिळाली. आज एक किलो चांदीची किंमत २,३६,८०९ रुपये आहे. बुधवारी चांदीचा दर २,४९,९०७ रुपये प्रति किलो होता, म्हणजेच आज चांदीच्या दरात प्रति किलो १३,०९८ रुपयांची घट झाली आहे. दुसरीकडे, bullions.co.in नुसार चांदी १३१२० रुपयांच्या घसरणीसह २,३५,०५० रुपये प्रति किलो दरानं विकली जात आहे. विशेष म्हणजे आयबीजेए दिवसातून दोनदा सोने-चांदीचे दर जाहीर करते.

फेडच्या निर्णयाचा बाजारावर परिणाम

अमेरिकन फेडरल रिझर्व्हने सलग दुसऱ्यांदा व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. १८ मार्च रोजी झालेल्या फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या (FOMC) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून सध्या फेडरल फंड रेट ३.५% ते ३.७५% च्या मर्यादेत स्थिर आहे. मध्य-पूर्वेतील तणावामुळे महागाई वाढण्याचा धोका असल्यानं फेडचा हा निर्णय बाजाराच्या अपेक्षेनुसारच होता. यापूर्वी सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर २०२५ मध्ये फेडनं सलग तीन वेळा ०.२५% दरानं कपात केली होती. गुंतवणूकदारांचं लक्ष फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या वक्तव्यावर होतं, ज्यानं बाजाराची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold, silver prices crash: Gold plunges ₹13,000; major fall observed.

Web Summary : Gold and silver prices witnessed a significant drop. Gold fell by ₹3,242 per 10 grams, while silver plummeted by ₹13,098 per kg, according to IBJA. The US Federal Reserve's decision to hold interest rates steady impacted the market.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूकपैसागुढीपाडवा 2026गुढीपाडवा