Donald Trump Tariff: डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लागू करूनही अमेरिकाभारताकडून मोठ्या प्रमाणावर वस्तूंची खरेदी करत आहे. सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर महिन्यात भारताची निर्यात १९.४ टक्क्यांनी वाढून ३८.१ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे, जी गेल्या तीन वर्षांतील सर्वात चांगली कामगिरी आहे.
या वाढीमागे अमेरिका आणि चीनला मोठ्या प्रमाणात निर्यात झालेल्या मालाचा वाटा आहे. यासोबतच, आयातीत २ टक्क्यांची घसरण झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात आयात ६२.७० अब्ज डॉलर्सवर राहिली. विशेष म्हणजे, व्यापार तूट २ टक्क्यांनी घसरून नोव्हेंबर महिन्यात २४.६० अब्ज डॉलर्सवर आली, जी जून महिन्यानंतरची सर्वात कमी पातळी आहे. ऑक्टोबर महिन्यात भारताच्या निर्यातीत १२ टक्क्यांची घसरण झाली होती. त्यामुळे आता झालेली ही वाढ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी आहे.
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम दिसला नाही
ताज्या आकडेवारीनुसार, अमेरिकेला झालेली भारताची निर्यात सुमारे ७ अब्ज डॉलर्स इतकी होती, जी २२.६ टक्क्यांची वाढ दर्शवते. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लागू केले असतानाही ही स्थिती कायम आहे.
चीनकडूनही जोरदार खरेदी
नोव्हेंबर महिन्यात चीननं भारताकडून २.२ अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची खरेदी केली, ज्यात ९० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. यामुळे चीननं नेदरलँड्सला मागे टाकून भारताचं तिसरं सर्वात मोठं निर्यात ठिकाण बनलं आहे.
भारत सर्वाधिक निर्यात कोणाला करतो?
नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार, निर्यातीच्या बाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. तर, यूएई दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात चीन या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. भारताच्या इंजिनीअरिंग गूड्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि पेट्रोलियम वस्तूंची मागणी वेगवेगळ्या देशांमध्ये खूप राहिली आहे.
आयातीतील घसरणीमागे कारण काय?
तज्ज्ञांचं मत आहे की, निर्यातीतील वाढ आणि आयातीतील घसरण यामागे सणासुदीचा हंगाम संपणं हे प्रमुख कारण आहे, ज्यामुळे मागणीत घट झाली आहे. भारतानं आयात केलेल्या सोन्यात नोव्हेंबर महिन्यात ५९ टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. गेल्या महिन्यात केवळ ४ अब्ज डॉलर्सचं सोनं खरेदी केलं गेलं.
Web Summary : Despite Trump's tariffs, India's exports surged 19.4% in November, driven by strong demand from the US and China. Imports declined, narrowing the trade deficit. Gold imports saw a significant drop. The US remains the top export destination, followed by the UAE, with China now in third place.
Web Summary : ट्रम्प के टैरिफ के बावजूद, अमेरिका और चीन से मजबूत मांग के कारण नवंबर में भारत का निर्यात 19.4% बढ़ा। आयात में गिरावट आई, जिससे व्यापार घाटा कम हुआ। सोने के आयात में भारी गिरावट आई। अमेरिका शीर्ष निर्यात गंतव्य बना हुआ है, उसके बाद यूएई और अब चीन तीसरे स्थान पर है।