Join us

1 वर्षात दिला 180% रिटर्न, कंपनी बनवते Google चे स्मार्टफोन्स; आज शेअर्सने गाठला उच्चांक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 17:46 IST

Dixon Technologies share price: कंपनीने एका वर्षात गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

Dixon Technologies share price: डिक्सन टेक्नॉलॉजी या प्रसिद्ध कंपनीच्या शेअरमध्ये आठवड्याच्या पहिल्या दिवशी(दि.2) जोरदार वाढ झाली. बीएसईवर कंपनीचा शेअर 6.5 टक्क्यांनी वाढून 16836.65 रुपयांवर पोहोचला. कंपनीचा हा सर्वकालीन उच्चांक आहे. पण, या शेअरच्या वाढीमागे नेमकं काय कारण आहे? जाणून घ्या...

डिक्सनची उपकंपनीने करते Goole साठी कामकंपनीच्या शेअर्सच्या वाढीमागील कारण एक बातमी आहे. डिक्सनची उपकंपनी Padget Electronics Private ने Compal सोबत भागीदारीत Google Pixel स्मार्टफोनचे उत्पादन सुरू केले आहे. कंपनी गुगलच्या इंडिया युनिटसाठी हे उत्पादन करत आहे. एक्सचेंजला दिलेल्या माहितीत, नोएडामधील कारखान्यात याचे उत्पादन होत असल्याचे सांगितले आहे. 

ब्रोकरेज कामगिरीवर बुलिशबिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, नोमुरा डिक्सन टेक्नॉलॉजीजवर उत्साही आहे. ब्रोकरेज हाऊसला विश्वास आहे की, कंपनी आर्थिक वर्ष 2027 पर्यंत 47 मिलियन फोन उत्पादनाचे लक्ष्य साध्य करेल. हे देशांतर्गत एकूण मागणीच्या 30 टक्के असेल. नोमुराने डिक्सनला 'बाय' रेटिंग दिले असून, शेअर्स 18654 रुपयांवर जाण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. 

कशी आहे शेअरची कामगिरी ?गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 78.05 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, 2024 मध्ये आतापर्यंत हा शेअर 159.50 टक्क्यांनी वाढला आहे. तसेच, एका वर्षात कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 181 टक्के परतावा दिला आहे. 

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुगल