Join us

मृत्यूनंतरही डिजिटल मालमत्तेची चिंता नाही! डिजिलॉकरमध्ये नॉमिनी कसा जोडायचा? जाणून घ्या सोपी प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 12:30 IST

DigiLocker Nominee Access : क्लाउड-आधारित डिजिटल वॉलेट म्हणून, डिजीलॉकर आर्थिक आणि इतर कागदपत्रांच्या डिजिटल आवृत्त्या सुरक्षितपणे संग्रहित करते. गुंतवणूकदार आता त्यांचे डीमॅट आणि म्युच्युअल फंड खाते देखील त्यात लिंक करू शकतात.

DigiLocker : आजच्या डिजिटल युगात आपले महत्त्वाचे दस्तऐवज आणि आर्थिक नोंदी डिजिलॉकरमध्ये सुरक्षित ठेवणे एक सामान्य बाब झाली आहे. मात्र, तुमच्या आकस्मिक निधनानंतर तुमच्या महत्त्वाच्या आर्थिक मालमत्तेची माहिती तुमच्या वारसदारांना किंवा कुटुंबाला वेळेवर उपलब्ध होईल का? या प्रश्नाचे उत्तर होय आहे! 

डिजिलॉकर हे एक क्लाउड-आधारित डिजिटल वॉलेट आहे, जे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने विकसित केले आहे. यात ठेवलेले दस्तऐवज कायदेशीररित्या मूळ कागदपत्रांएवढेच वैध मानले जातात. यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, बँक स्टेटमेंट आणि महत्त्वाचे शैक्षणिक दस्तऐवज सुरक्षित असतात.

आता या डिजिलॉकरमध्ये तुम्ही तुमच्या आर्थिक खात्यांचे दस्तऐवज लिंक करून नॉमिनी कसे जोडू शकता, याची सोपी प्रक्रिया जाणून घेऊया.

डिजिलॉकरमध्ये खाती लिंक करण्याची सोपी प्रक्रियातुमचे आर्थिक दस्तऐवज (उदा. डीमॅट होल्डिंग्स, म्युच्युअल फंड स्टेटमेंट) डिजिलॉकरशी लिंक करण्याचे आणि नॉमिनी जोडण्याचे सोपे टप्पे खालीलप्रमाणे आहेत.

  • लॉग इन करा: डिजिलॉकर वेबसाइट किंवा ॲपवर जा. मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांकाचा वापर करून साइन अप करा आणि OTP द्वारे पडताळणी पूर्ण करा.
  • पॅन लिंक करा: 'Profile' सेक्शनमध्ये जाऊन तुमचा पॅन क्रमांक लिंक करा, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या वित्तीय दस्तऐवजांपर्यंत पोहोचता येईल.
  • दस्तावेज शोधा: होमपेजवर “Search Documents” वर क्लिक करा. तिथे “NSDL”, “CDSL” किंवा म्युच्युअल फंडांसाठी “CAMS/KFinTech” शोधून “Demat Holdings Statement” किंवा “Mutual Fund Statement” असे पर्याय निवडा.
  • माहिती भरा: जारी करणारी संस्था निवडा आणि पॅन, जन्मतारीख किंवा क्लायंट आयडी यांसारखे आवश्यक तपशील भरा. पडताळणी पूर्ण होताच तुमचे दस्तऐवज आपोआप डिजिलॉकरमध्ये सेव्ह होतील.
  • नॉमिनी जोडा: सर्वात महत्त्वाचे म्हणजे, Nominee किंवा Sharing Settings मध्ये जा. तुमच्यावर विश्वास असलेल्या व्यक्तीचा ईमेल किंवा मोबाईल नंबर जोडा. तुमच्या मृत्यूनंतर ही व्यक्ती तुमच्या वित्तीय दस्तऐवजांपर्यंत पोहोचू शकेल.

नॉमिनी/वारसदाराने काय करावे?

  • डिजिलॉकर हे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाच्या नागरी नोंदणी प्रणालीशी जोडलेले आहे, जी जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रे जारी करते. ही प्रक्रिया खालीलप्रमाणे काम करते.
  • सिस्टीम अपडेट: जर मृत्यू प्रमाणपत्रात आधार क्रमांक दिला असेल, तर डिजिलॉकरची सिस्टीम आपोआप व्यक्तीची स्थिती "मृत" म्हणून अपडेट करते.
  • केवायसी एजन्सीद्वारे अपडेट: जर आधार क्रमांक लिंक नसेल, तर केवायसी नोंदणी एजन्सीजकडून मिळालेली माहिती वापरली जाते.
  • वित्तीय संस्थांना सूचना: कुटुंबातील सदस्य, नॉमिनी किंवा कायदेशीर वारसदार जर सेबी-नोंदणीकृत सत्यापित मृत्यू प्रमाणपत्र सादर करतात, तर मृत्यूची माहिती KRA सिस्टीममध्ये नोंदवली जाते.
  • यामुळे सर्व संबंधित वित्तीय संस्थांना याची सूचना मिळते. त्या संस्था मृत व्यक्तीचे खाते गोठवतात आणि नॉमिनीला मालमत्ता हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सांगतात.

वाचा - कॅनरा बँकेच्या FD मध्ये २ लाख रुपये गुंतवा; ३ वर्षांत मिळवा ४५ हजार रुपयांचे निश्चित व्याज!

नॉमिनीला मिळणारा ॲक्सेस: नॉमिनी यानंतर डिजिलॉकरमध्ये लॉग इन करून गुंतवणूकदाराचे दस्तऐवज “read-only” मोडमध्ये पाहू शकतो. म्हणजेच, ते दस्तऐवज पाहू शकतात, पण त्यात कोणताही बदल करू शकत नाहीत. हे पाऊल भविष्यात होणारे कायदेशीर आणि आर्थिक त्रास कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Secure digital assets after death: Add nominee to DigiLocker easily.

Web Summary : Secure your digital legacy! DigiLocker now allows linking financial documents and adding nominees. This ensures easy access for heirs, preventing legal hassles. Update KYC for seamless transfer.
टॅग्स :डिजिटलपैसाशेअर बाजारगुंतवणूक