Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आमच्या चुका झाल्या असतील, पण आता..." झोमॅटो संस्थापकाची जुन्या कर्मचाऱ्यांसाठी भावनिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 15:23 IST

Zomato Deepender Goyal : इटरनल या कंपनीचे संस्थापक आणि उपाध्यक्ष दीपेंद्र गोयल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट लिहीत जुन्या कर्मचाऱ्यांना साद घातली आहे.

Zomato Deepender Goyal : कॉर्पोरेट जगतात कर्मचाऱ्यांची कपात किंवा राजीनामा हा नेहमीच कटू अनुभव असतो. मात्र, 'इटरनल' (पूर्वीचे झोमॅटो) या कंपनीचे संस्थापक आणि उपाध्यक्ष दीपेंद्र गोयल यांनी या परंपरेला छेद देत आपल्या माजी कर्मचाऱ्यांसाठी भावनिक साद घातली आहे. "कदाचित तेव्हा आम्ही चुकलो असू, पण आता तुम्ही पुन्हा या," अशा शब्दांत गोयल यांनी जुन्या सहकाऱ्यांना कंपनीत परत येण्याचे जाहीर निमंत्रण दिले आहे.

आमच्यात काही कमतरता असेल..सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (ट्विटर) वर दीपेंद्र गोयल यांनी एक लांबलचक आणि भावूक पोस्ट शेअर केली आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने कंपनी सोडली किंवा ज्यांना व्यवस्थापनाकडून जाण्यास सांगण्यात आले होते, त्यांना उद्देशून त्यांनी हा संदेश लिहिला आहे. गोयल यांनी प्रांजळ कबुली दिली की, "त्याकाळी झोमॅटो कदाचित प्रत्येकासाठी योग्य कामाचे ठिकाण नसेल. अनेकांना हवं तसं वर्क-कल्चर किंवा हवी तशी लीडरशिप आमच्याकडून मिळाली नसेल."

भावनिक नाते अजूनही कायमनोकरी सोडल्यानंतरही कर्मचाऱ्यांचे कंपनीशी असलेले नाते संपत नाही, असे गोयल यांचे मत आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, अनेक माजी कर्मचाऱ्यांना झोमॅटोमध्ये जे प्रेम आणि घरपण मिळाले, तसा अनुभव त्यांना इतरत्र कुठेही मिळाला नसेल याची मला जाणीव आहे. कंपनीने आपल्या भूतकाळातील चुकांमधून खूप काही शिकले आहे आणि आता नवीन उर्जेने आम्ही जुन्या टॅलेंटचे स्वागत करण्यास सज्ज आहोत. जे कर्मचारी पुन्हा एकदा झोमॅटोच्या प्रवासात सहभागी होऊ इच्छितात, त्यांच्यासाठी आमचे दरवाजे नेहमीच उघडे असतील.

वाचा - पीएफच्या व्याजाला कात्री लागणार? ८.२५ टक्क्यांवरून दर कमी होण्याची चिन्हे; मार्चमधील बैठकीकडे लक्ष

कॉर्पोरेट विश्वात चर्चेचा विषयएका बाजूला मोठ्या कंपन्या टाळेबंदी करत असताना, दीपेंद्र गोयल यांनी घेतलेली ही भूमिका कॉर्पोरेट कल्चरमध्ये एक मैलाचा दगड मानली जात आहे. केवळ नफा-तोटा न पाहता मानवी नातेसंबंधांना महत्त्व देणाऱ्या या पोस्टमुळे दीपेंद्र गोयल यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Zomato Founder's Emotional Appeal: 'Come Back,' Former Employees Invited

Web Summary : Zomato's Deepinder Goyal invites former employees back, acknowledging past shortcomings. He recognizes that Zomato might not have been suitable for everyone, but now welcomes back talent, valuing human connections over profit.
टॅग्स :झोमॅटोव्यवसायकर्मचारीनोकरी