सध्या शेअर बाजारात स्मॉलकॅप आणि पेनी स्टॉककडे (Penny Stock) गुंतवणूकदारांचा कल वाढताना दिसता आहे. डीप डायमंड इंडियाच्या शेअरला सोमवारी सलग तिसऱ्या सत्रात ५% चे अप्पर सर्किट लागले. बीएसईवर हा शेअर सध्या ₹८.२८ या नव्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
तेजीचे मुख्य कारण -शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, या तेजीचे मुख्य कारण म्हणजे कंपनीच्या संचालक मंडळाची (Board of Directors) बैठक. ही बैठक शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत बोर्ड सदस्य अंतरिम लाभांश (Interim Dividend) जाहीर करणे आणि त्याचे वाटप करण्याच्या प्रस्तावावर विचार करणार आहेत. याशिवया, बोर्डाकडून कंपनीची सहयोगी फर्म असलेल्या 'फेरी ऑटोमोटिव्ह्स प्रायव्हेट लिमिटेड' (Ferry Automotives Pvt. Ltd.) मध्ये इक्विटी शेअर्सच्या माध्यमातून गुंतवणुकीला मंजुरीही मिळण्याची शक्यता आहे. तसेच, कंपनी सध्या दिलेले कर्ज इक्विटीमध्ये रूपांतरित करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा करणार आहे.
गेल्या तीन दिवसांपासून शेअरला सातत्याने अप्पर सर्किट लागत आहे, जे जोरदार खरेदी आणि मजबूत वॉल्यूम दर्शवते. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सुमारे ३५ लाख इक्विटी शेअर्सचा व्यवहार झाला, जो मागील महिन्याच्या सरासरी वॉल्यूमपेक्षा (२१ लाख) खूप जास्त आहे.
गुंतवणूकदारांना मिळाला जबरदस्त परतावा -या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना १ महिन्यात ८९%, ३ महिन्यांत १०२% तर ५ वर्षांत ५३७% एवढा मल्टिबॅगर परतावा दिला आहे.
दुपारी साधारणपणे १ वाजण्याच्या सुमारास, डीप डायमंडचा शेअर ₹८.२८ च्या अप्पर सर्किटवर स्थिर होता. जर बोर्ड बैठकीत सकारात्मक निर्णय झाले, तर पुढील सत्रांमध्ये ही तेजी कायम राहण्याची शक्यता बाजार तज्ज्ञांनी वर्तवली आहे.(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
Web Summary : Deep Diamond India's stock hits a 52-week high after consecutive upper circuits. A board meeting to consider interim dividends and investments fuels investor interest. The stock has delivered substantial returns, with experts predicting continued gains if board decisions are favorable.
Web Summary : डीप डायमंड इंडिया का शेयर लगातार अपर सर्किट के बाद 52 सप्ताह के उच्च स्तर पर पहुंचा। अंतरिम लाभांश और निवेश पर विचार करने के लिए बोर्ड बैठक से निवेशकों की रुचि बढ़ी है। स्टॉक ने अच्छा रिटर्न दिया है, विशेषज्ञों का अनुमान है कि बोर्ड के फैसले अनुकूल होने पर लाभ जारी रहेगा।