Join us

इराणच्या हद्दीतून न जाण्याचा विमान कंपन्यांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 07:34 IST

अमेरिका व इराणमध्ये युद्धजन्य वातावरण निर्माण झाल्यामुळे भारतीय विमान कंपन्या इराणच्या हवाई हद्दीतून आपली विमाने पाठविणार नाहीत.

नवी दिल्ली : अमेरिका व इराणमध्ये युद्धजन्य वातावरण निर्माण झाल्यामुळे भारतीय विमान कंपन्या इराणच्या हवाई हद्दीतून आपली विमाने पाठविणार नाहीत, असे भारतीय विमान उड्डाण महासंचालनालयाने जाहीर केले आहे, तसेच युद्धजन्य वातावरणात कच्च्या तेलाच्या जहाजांवर नौदलाचे अधिकारी पाठविण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.इराणच्या हवाई हद्दीत तणाव व लष्करी हालचाली वाढल्या असल्याने ही खबरदारी घेण्यात येत आहे. अमेरिकेने हल्ला केला, तर त्याला आम्ही चोख उत्तर देऊ, असे सांगतानाच अमेरिकेच्या हल्ल्याचे संपूर्ण मध्यपूर्व आशियावर परिणाम होतील, असा इशारा इराणने दिला.आपल्या हवाई हद्दीतून जाणारा अमेरिकेचा ड्रोन इराणने पाडला होता. त्यानंतर, प्रवासी व मालवाहतूक विमानांच्या बाबतीतही असे घडू शकेल, असा इशारा फेडरेशन आॅफ एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एफएए- नागरी विमान वाहतूक प्रशासन संघटना)ने दिला होता. त्यानंतर विमान कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :विमानइराण