Join us
Daily Top 2Weekly Top 5

₹३ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, २०% वाढली किंमत, सातत्यानं दिसतेय तेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 15:38 IST

DCM Financial Services Ltd Share: अचानक आलेल्या या मोठ्या उसळीमुळे गुंतवणूकदारांचं लक्ष पुन्हा एकदा या स्मॉलकॅप स्टॉककडे वेधलं गेलं आहे. पाहा कोणती आहे ही कंपनीय

DCM Financial Services Ltd Share: फायनान्शिअल सेक्टरमधील स्मॉलकॅप कंपनी 'डीसीएम फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड'च्या शेअर्समध्ये मंगळवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. व्यवहारादरम्यान कंपनीचा शेअर त्याच्या मागील बंद भाव ३.९१ रुपयांवरून सुमारे १९.९५% वधारून ४.६९ रुपयांवर पोहोचला. अचानक आलेल्या या मोठ्या उसळीमुळे गुंतवणूकदारांचं लक्ष पुन्हा एकदा या स्मॉलकॅप स्टॉककडे वेधलं गेलं आहे.

शेअरमधील हालचाली आणि मार्केट कॅप

मंगळवारी इंट्रा-डे व्यवहारात हा शेअर ४.६९ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करताना दिसला. या तेजीमुळे कंपनीचं मार्केट कॅप वाढून सुमारे १०.३८ कोटी रुपयांवर पोहोचलं. तरीही, ही कंपनी अद्याप अत्यंत लहान मार्केट कॅप असलेल्या श्रेणीत येत असल्यानं, यामध्ये चढ-उतार होण्याची शक्यता तुलनेनं जास्त आहे. ट्रेडिंग वॉल्यूमचा विचार केल्यास, सकाळपर्यंत सुमारे १,३५,५२२ शेअर्सचा व्यवहार झाला होता. वॉल्यूममधील वाढ ही सहसा गुंतवणूकदारांचा रस वाढत असल्याचे संकेत देते, मात्र स्मॉलकॅप शेअर्समधील अशा हालचाली अनेकदा जास्त जोखमीच्या असतात.

जेव्हा शून्यच्याही खाली गेलेली कच्च्या तेलाची किंमत; मोफतही द्यायला तयार झालेल्या इंधन कंपन्या, कधी घडलेला प्रकार?

शेअर्सची कामगिरी आणि आर्थिक स्थिती

अलीकडील कामगिरीवर नजर टाकल्यास, गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये हा शेअर सुमारे १३% नं वधारलाय. म्हणजेच शॉर्ट टर्ममध्ये यामध्ये सातत्याने तेजी दिसून आली आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, अशा स्टॉक्समध्ये अनेकदा मोठी रॅली आणि मोठी घसरण दोन्ही पाहायला मिळू शकतात, त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. फंडामेंटल निर्देशकांबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीचा प्राईस टू अर्निंग (P/E) रेशो सध्या -८.६९ आहे. निगेटिव्ह P/E चा अर्थ असा होतो की कंपनी सध्या नफ्यात नाही किंवा तिची कमाई स्थिर नाही.

काय म्हणाले तज्ज्ञ?

तज्ज्ञांच्या मते, स्मॉलकॅप आणि कमी मार्केट कॅप असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी कंपनीची आर्थिक स्थिती, बिझनेस मॉडेल आणि जोखीम नीट समजून घेतली पाहिजे. केवळ तेजी पाहून गुंतवणूक करणं जोखमीचं ठरू शकते, म्हणून दीर्घकालीन गुंतवणुकीपूर्वी पूर्ण माहिती घेणं आवश्यक मानलं जातं.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

 

English
हिंदी सारांश
Web Title : DCM Financial Services Share Price Jumps 20% Amid Investor Rush

Web Summary : DCM Financial Services shares surged nearly 20%, attracting investor attention. The smallcap's market cap rose to ₹10.38 crore. Experts advise caution due to high volatility and negative P/E ratio. Investors should consider risks before investing.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा