Join us
Daily Top 2Weekly Top 5

या 5 मुस्लिम देशांमधून कोट्यवधी रुपये भारतात आले; हा देश अव्वल, RBI ची माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 19:39 IST

कोणत्या देशातून किती पैसे आले, याबाबत RBI ने रिपोर्ट जारी केली आहे.

RBI Report : दरवर्षी परदेशातून किती पैसा भारतात येतो आणि कोणत्या देशातून येतो, यावर अनेकदा चर्चा होते. हा पैसा किती भारतीय प्रवासी परदेशात राहतात हे दर्शविते. RBI ने आपल्या बुलेटिनमध्ये यासंबंधीचा डेटा जारी केला आहे. यावरुन असे दिसून येते की, 2023-24 मध्ये एकूण 118.7 अब्ज डॉलर्स भारतात आले.

कोणत्या आखाती देशातून भारतात पैसा येतो?RBI बुलेटिन 2025 नुसार, 2023-24 मध्ये भारतात पाठवलेल्या एकूण रेमिटन्समध्ये संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतार, ओमान आणि बहरीन यांचा समावेश असलेल्या गल्फ कोऑपरेशन कौन्सिलचा वाटा सुमारे 38 टक्के होता. म्हणजेच भारतात येणाऱ्या एकूण 118.7 अब्ज विदेशी डॉलर्सपैकी 38 टक्के रक्कम या आखाती देशांमधून आली आहे. आता आपण $118.7 बिलियनपैकी 38 टक्के काढले, तर ते $45.10 बिलियन होईल. भारतीय रुपयाप्रमाणे हे 3,896.3 अब्ज भारतीय रुपये आहेत.

कोणता देश अव्वल ?आखाती देशांमध्ये संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतार, ओमान आणि बहरीन, संयुक्त अरब अमिराती (UAE) भारताला पैसे पाठवण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. याचा अर्थ UAE मध्ये राहणारे प्रवासी इतर आखाती देशांमध्ये राहणाऱ्या प्रवासी लोकांपेक्षा जास्त पैसे पाठवतात. 2020-21 मध्ये भारतात पाठवलेल्या एकूण रेमिटन्समध्ये UAE चा वाटा 18 टक्के होता, जो 2023-24 मध्ये वाढून 19.2 टक्के झाला. UAE हे भारतीय स्थलांतरित कामगारांचे सर्वात मोठे केंद्र आहे. याशिवाय, येथील बहुतांश स्थलांतरित बांधकाम उद्योग, आरोग्यसेवा, आदरातिथ्य आणि पर्यटन क्षेत्रात काम करतात.

जेव्हा तुम्ही जगभरातील देशांची यादी पाहाल, तेव्हा तुम्हाला कळेल की, पैसे पाठवण्याच्या बाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजे सर्वाधिक पैसा अमेरिकेतून भारतात येतो. RBI च्या बुलेटिननुसार, 2023-24 मध्ये भारतात पाठवलेल्या एकूण रेमिटन्समध्ये अमेरिकेचा वाटा सर्वाधिक 27.7 टक्के होता, तर 202-21 मध्ये हा वाटा 23.4 टक्के होता.

टॅग्स :भारतगुंतवणूकसंयुक्त अरब अमिराती