Join us

coronavirus: राज्यात २५ हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू, सहा लाख कामगार रुजू : उद्योगमंत्री देसाई यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 00:15 IST

मराठा चेंबर्स आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर, पुणेच्या वतीने आयोजित बेवनारमध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी ही माहिती दिली.

- विशेष प्रतिनिधी  मुंबई : राज्यात उद्योग क्षेत्र पूर्वपदावर येत आहे. रेड झोनवगळता सध्या राज्यात ५७,७४५ उद्योगांना परवाने दिले असून, २५ हजार कंपन्यांनी उत्पादनसुरू केले आहे. त्यामध्ये सुमारे साडेसहा लाख कामगार काम करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात नऊ हजार १४७ कारखान्यांना परवाने दिले आहेत. त्यापैकी५७७४ कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे.मराठा चेंबर्स आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर, पुणेच्या वतीने आयोजित बेवनारमध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी ही माहिती दिली.मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड हा भाग रेड झोनमध्ये आहे. येथील उद्योग सुरू करण्याची मागणी होत आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी मेअखेर महाराष्ट्र ग्रीन झोन करायचा संकल्प केला आहे.त्यामुळे तोपर्यंत सर्वांनी सहकार्य करावे. आपली पहिली लढाई कोरोनासोबत आहेत. त्यामुळे थोडी घाई करू नये, असे त्यांनी सांगितले. या संवादात उद्योग विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे सीईओ पी. अन्बलगन आदी उपस्थित होते.विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी वाटाघाटीराज्यात विदेशी गुंतवणूक यावी यासाठी वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. अनेक देश महाराष्ट्राकडे चौकशी करत आहेत. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, जपान, तैवान, दक्षिण कोरिया येथील प्रतिनिधी उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. पुढील काळात राज्यात अनेक मोठे प्रकल्प सुरू होणार असल्याने लघुउद्योगांनी सेवा पुरवण्यासाठी सज्ज राहावे.वीजबिलात सवलतस्थिर वीजबिलाबाबत ऊर्जामंत्र्यांसोबत बैठक घेतली असून, जेवढा विजेचा वापर होईल तेवढेच बिल आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या शिवाय कर्जाचे हप्ते फेडण्यासाठीदेखील सवलती जाहीर केल्या आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्याअर्थव्यवस्थामहाराष्ट्रसुभाष देसाई