Join us  

Share Market Bloodbath : अर्थसंकल्पापूर्वीच शेअर बाजारात हाहाकार, Nifty ४६८, तर Sensex १५४५ अंकांनी कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 4:32 PM

Share Market Bloodbath, Closing Update : गेल्या पाच दिवसांपासून सातत्यानं शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. गेल्या सोमवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकात किंचित वाढ दिसली होती. 

Share Market Bloodbath, Closing Update : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठी घसरण दिसू येत आहे. गेल्या सोमवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकात किरकोळ वाढ पाहायला मिळाली होती. परंतु मंगळवारपासून शेअर बाजारात पुन्हा घसरण सुरू झाली. शेअर बाजाराची ही घसरण गेल्या पाच दिवसांपासून कायम आहे. सोमवारी म्हणजेच २४ जानेवारी रोजीही शेअर बाजारात मोठी घसरण दिसू आहे. नव्या वर्षात झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. 

आज सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये अडीच टक्क्यांपेक्षा अधिक घसरण दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १५४५.६७ अंकांनी घसरून ५७४९१.५१ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकात ४६८०५ अंकांची घसरण होऊन तो १७,१४९.१० अंकांवर बंद झाला. शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी ही घसरण पाहायला मिळाली. 

आज नायका (Nykaa), झोमॅटो (Zomato) आणि पेटीएमसारख्या (Paytm) शेअर्सना जबर फटका बसला. शुक्रवारी २७० लाख कोटी रुपयांचं असलेलं मार्केट कॅप आता कमी होऊन २६० लाख कोटी इतकं झालं आहे. तर दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये ३.९५ टक्क्यांची घसरण होऊन ते २३७९.९० रुपयांवर आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये २.९० टक्क्यांची घसरण होऊन ते १७३४ रुपयांवर बंद झाला. आज सर्वच क्षेत्रांच्या शेअर्सवर दबाव दिसून आला. रियल्टी, मेटल, मीडिया, आयटी आणि ऑटो या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजारझोमॅटोभारत