Join us  

भारताशी पंगा कॅनडाच्या अंगलट, महिंद्रांनंतर जिंदाल यांनी दिला ‘जोर का झटका’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 2:17 PM

कॅनडाच्या समोरील समस्या आता दिवसेंदिवस वाढत आहेत.

कॅनडाच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. आता एक आणखी प्रकरण समोर आलंय. जेएसडब्ल्यू स्टीलनं कॅनडाला आता एक धक्का दिला आहे. जिंदाल यांनी मोठं पाऊल उचलत कॅनडाला मोठा झटका दिलाय. भारतासोबत घेतलेला पंगा त्यांना आता महागात पडतोय. या वादाचा परिणाम दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहे. भारतीय कंपन्या कॅनडातील त्यांचे व्यवसाय गुंडाळत आहेत. यामुळे कॅनडाला मोठा झटका बसलाय.दोन देशांत वाढला तणाव; आनंद महिंद्रांच्या कंपनीचा कॅनडातील व्यापार बंद

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतातील सर्वात मोठी स्टील उत्पादक कंपनी जेएसडब्ल्यू स्टील (JSW Steel) आणि टेक रिसोर्सेस यांच्यातील स्टेकबाबतची चर्चा मंदावली आहे. रिपोर्ट्सनुसार, जेएसडब्ल्यू टेक रिसोर्सेसमधील ३४-३७ टक्के हिस्सा खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे.तणाव कमी होण्याची प्रतीक्षाजेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड कॅनेडियन कंपनी टेक रिसोर्सेसचे स्टील उत्पादन युनिट आणि कोळसा युनिटमधील भागभांडवल खरेदी करणार आहे. परंतु दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा करार मंदावला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी दोन्ही देशांमधील तणाव कमी होण्याची प्रतीक्षा करत आहे.आयात निर्यातीवर परिणामभारत आणि कॅनडादरम्यान तणाव वाढल्यास दोन्ही देशांमधील आयात-निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार, एप्रिल २००० ते मार्च २०२३ पर्यंत, कॅनडानं भारतात अंदाजे ३३०६ मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. याशिवाय भारत हा कॅनडाचा नववा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार आहे.टेक रिसोर्सेसचे शेअर्स आपटलेजेएसडब्ल्यू स्टील कंपनीला या कॅनेडियन कंपनीचे ३४-३७ टक्के शेअर्स खरेदी करायचे आहेत. कराराची प्रक्रिया मंद होत असल्याचं वृत्त समोर येताच, टेक रिसोर्सेसचे शेअर्स आपटले. कंपनीचे शेअर्स ४ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर अर्थव्यवस्थाकॅनडाची अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर अवलंबून आहे. दरवर्षी, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत ३० बिलियन डॉलर्सचं योगदान देतात. ज्यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे. भारतीय विद्यार्थ्यांची फी म्हणून मोठी रक्कम कॅनडाला मिळते. कॅनडामध्ये सुमारे ३ लाख भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

टॅग्स :कॅनडाभारतनरेंद्र मोदीजस्टीन ट्रुडो