Join us
Daily Top 2Weekly Top 5

१५,००० शाळा, ५०० कॉलेजांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब्स; गेमिंग सेक्टरमध्ये १० लाख नोकऱ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 13:29 IST

Budget 2026: कंटेंट क्रिएटर्ससाठी सरकारची मोठी घोषणा!

Budget 2026: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज(१ फेब्रुवारी २०२६) संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन हे ‘विकसित भारत’चे सर्वात मोठे इंजिन असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, भारत आता केवळ तंत्रज्ञानाचा वापर करणारा देश न राहता तंत्रज्ञानात नेतृत्व करणारा देश बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्याान, या अर्थसंकल्पात कंटेंट क्रिएशन, गेमिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), डीप-टेक, सेमीकंडक्टर आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.

कंटेंट क्रिएटर्ससाठी मोठी घोषणा

एनीमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (ABGC) क्षेत्राला चालना देण्यासाठी देशभरात १५,००० शाळांमध्ये आणि ५०० कॉलेजांमध्ये विशेष कंटेंट क्रिएटर लॅब्स स्थापन केल्या जाणार आहेत. या लॅब्समधून विद्यार्थ्यांना गेम डिझाइन, अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल स्टोरीटेलिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचे आधुनिक प्रशिक्षण दिले जाईल.

गेमिंग सेक्टरला मोठे बळ

सरकारने गेमिंग इंडस्ट्रीला भविष्यातील रोजगारनिर्मितीचे केंद्र मानले असून, १० लाखांहून अधिक प्रोफेशनल्सना रोजगार, गेमिंग आणि क्रिएटिव्ह स्टार्टअप्ससाठी ₹१०,००० कोटींचा विशेष फंड जाहीर केला आहे. यामुळे भारतातील क्रिएटर इकॉनॉमी आणखी वेगाने वाढण्याची शक्यता आहे.

AI आणि डिजिटल भविष्यासाठी रोडमॅप

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सरकारी सेवा आणि प्रशासन अधिक प्रभावी करण्यासाठी केला जाणार आहे. देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये AI-आधारित सोल्यूशन्स राबवले जातील. याशिवाय, IITs आणि IISc मध्ये AI आणि डीप-टेक संशोधनासाठी १०,००० नवीन टेक फेलोशिप्स जाहीर केल्या आहेत. यंदा सेमीकंडक्टर मिशन २.० अंतर्गत ₹४०,००० कोटींची तरतूद केली असून, भारताला ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भारतीय चिप्समुळे गेमिंग आणि डिजिटल हार्डवेअर स्वस्त व अधिक सक्षम होतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Budget 2026: Content creator labs, gaming jobs boost announced.

Web Summary : Budget 2026 focuses on technology, innovation, content creation and AI. 15,000 schools will get content creator labs. The gaming sector will see 10 lakh new jobs and a ₹10,000 crore fund. AI advancements and semiconductor manufacturing are also key.
टॅग्स :केंद्रीय अर्थसंकल्प 2026अर्थसंकल्प २०२६निर्मला सीतारामनआर्टिफिशिअल इंटेलिजन्सतंत्रज्ञान