nikhil kamath makhana : मोदी सरकारने शनिवारी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातील २ मोठ्या घोषणांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं. या दोन्ही योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत. पहिली आसाममध्ये युरिया या सासायनिक खतांचा प्रकल्पाची घोषणा आहे. तर दुसरी योजना बिहारसाठी करण्यात आली आहे. बिहारमध्ये मखाना मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पात ही घोषणा झाल्यापासून झिरोधा ट्रेडिंग ॲपचे सह-संस्थापक निखिल कामथ यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे.
वास्तविक, झिरोदाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांनी बजेटपूर्वी १७ जानेवारी २०२५ रोजी ही पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली होती. या पोस्टमध्ये सुपरफूड मखाना उद्योग येत्या काळात ६ हजार कोटी रुपयांचा उद्योग होण्याची क्षमता असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या पोस्टसोबत अनेक फोटो शेअर करताना त्यांनी मखाना हे सुपरफूड का आहे? हे स्पष्ट केले होते.
मखानाच्या शेतीवर निखिल कामथ काय म्हणाले?
इतकेच नाही तर कामथ यांनी मखानाच्या शेतीबद्दलही पुढे लिहिलं आहे. मखाना हे फार जास्त उत्पादन देणारे पीक नाही. याच्या बिया गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांना काटेरी पाने आणि चिखलाच्या दलदलीत जावे लागते. नंतर गोळा केलेल्या बिया उन्हात वाळवल्या जातात. त्यानंतर त्या हाताने फोडतात. या सर्व प्रक्रियेमध्ये बरेच पिक वाया जाते. एकूण पिकापैकी केवळ २ टक्के पिक निर्यात करण्यायोग्य राहते. त्यातही ४० टक्केच वापरता येत असल्याचे कामथ यांनी सांगितले.
मखाना बोर्डावर अर्थमंत्री काय म्हणाले?
सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, बिहारमधील मखाना मंडळाने सांगितले की, वाढत्या उत्पन्नाबरोबर फळांचा खपही वाढत आहे. राज्यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांची मजुरी वाढेल. बिहारच्या शेतकऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. राज्यात मखाना मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. याद्वारे शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि मदत करण्यात येणार आहे.